खजिना म्हणून चोराने मोठ्या बॅगेवरच मारला हात, उघडून पाहिलं तेव्हा डोळेच फिरले

Last Updated:

Funny Video Viral : पोतं घेऊन पळालेला तरुण काही दूरवर जातो. तिथं आजूबाजूला कुणीच नसतं. हे पाहून तो तरुण ते पोतं उलटं करतो. त्यातून जे बाहेर पडतं ते पाहून त्याला धक्काच बसतो.

News18
News18
नवी दिल्ली : चोरीचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, असाच एक चोरीचा व्हिडीओ जो तुफान व्हायरल होत आहे. चोराने बडा खजिना समजून मोठ्या बॅगेला हात टाकला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने ती उघडून पाहिली आणि त्याला मोठा झटका बसला. बॅगेत असं काही होतं की त्याने विचारही केला नव्हता.
व्हिडीओत तुम्ही पाहाल दोन तरुण रस्त्याने चालत आहेत. एकाच्या हातात एक मोठं पोतं आहे. समोरून एक तरुण धावत येतो आणि तो त्या तरुणाच्या हातातील पोतं खेचून तसाच पुढे धावत जातो. दोन्ही तरुण मागे पाहतात पण त्या तरुणाच्या मागे धावत काही जात नाही.
advertisement
पोतं घेऊन पळालेला तरुण काही दूरवर जातो. तिथं आजूबाजूला कुणीच नसतं. हे पाहून तो तरुण ते पोतं उलटं करतो. त्यातून जे बाहेर पडतं ते पाहून त्याला धक्काच बसतो. त्याला वाटलं होतं की त्या पोत्यात खजिना असेल पण त्यातून बाहेर पडतो तो कुत्रा. त्याला पाहून तरुण शॉक होतो. जणू त्याचे डोळेच फिरतात. तो टकामका पाहतच राहतो.
advertisement
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात सुधारणा करत म्हटलं होतं की, भटक्या कुत्र्यांना कायमचे आश्रयगृहात ठेवता येणार नाही. भटक्या कुत्र्यांवर महापालिकेची कारवाई सुरूच राहील. लसीकरणानंतर, कुत्र्यांना त्यांच्या मूळ भागात सोडलं जाईल. या वादविवादाच्या दरम्यान कुत्र्यांबद्दलचे काही मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच व्हिडीओपैकी हा एक व्हिडीओ आहे.



 










View this post on Instagram























 

A post shared by Ashish Rajwade (@ashishrajwade007)



advertisement
@ashishrajwade007 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'खजाना' असं लिहिलं आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. डोगेश भाई, मोठी चूक झाली आहे साहेब, डोंगर खोदल्यानंतर एक उंदीर बाहेर आला. अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर आली आहे. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
view comments
मराठी बातम्या/Viral/
खजिना म्हणून चोराने मोठ्या बॅगेवरच मारला हात, उघडून पाहिलं तेव्हा डोळेच फिरले
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement