VIDEO : कुत्र्याच्या तावडीत बिबट्या, केली हुशारीने सुटका, फक्त शिकारच नाही तर शिकारीतून सुटण्याचीही जबरदस्त टेक्निक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dog Leopard Video : नाशिकमधील बिबट्या आणि कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. निफाड तालुक्यातील नांदूर माध्यमेश्वर परिसरातील ही घटना आहे.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी/नाशिक : बिबट्या हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. त्याच्या शरीराची रचना फारच लवचिक आहे. त्यामुळे तो सर्वत्र शिकार करू शकतो. बिबट्या थेट लोकांच्या घरात शिरून शिकार करण्याची हिंमत ठेवतो. सोशल मीडियावर तर बिबट्याचे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ज्यामध्ये तो मानवी वस्तीत शिरून अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतो. अशा बिबट्यासमोर कुत्रा टिकेल का? पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, कुत्र्याने अक्षरश: बिबट्याची वाईट अवस्था केली आहे.
नाशिकमधील बिबट्या आणि कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. निफाड तालुक्यातील नांदूर माध्यमेश्वर परिसरातील ही घटना आहे. व्हिडीओत दोन कुत्रे आणि एक बिबट्या दिसतो. कदाचित बिबट्याने या कुत्र्यांवर हल्ला केला असेल. पण बिबट्याला कुत्र्याच्या ताकदीचा अंदाज लावला आला नाही. कुत्र्यानं त्याच्यावर जोरदार पलटवार केला.
advertisement
कुत्र्याने बिबट्याचं तोंड आपल्या तोंडात धरून ठेवलं, इतकं घट्ट पकडलं की बिबट्याला हालचाल करणंही कठीण झालं आहे. व्हिडीओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता, कुत्रा या बिबट्याला अक्षरश: फरफटत नेत आहे. 300 मीटर तोंडात ओढत खेचत नेलं आहे. गांगुर्डे वस्तीवर हा थरार रंगला आहे.
पाहून तुम्हाला बिचाऱ्या बिबट्याचीच दया येईल. बिबट्याला शक्ती वापरता येत नव्हती पण त्याने युक्ती वापरली. त्याने मृत झाल्याचं नाटक केलं. व्हिडीओतही तुम्ही पाहाल की तो नंतर फार हलताना दिसत नाही आहे. त्याने आपलं शरीर मृतदेहासारखं ताठ केलं आहे. कुत्र्यालाही बिबट्या मृत झाला असंच वाटलं आणि त्याने बिबट्यावरील पकड सैल केली. तशी बिबट्याने संधी साधली आणि त्याने तिथून पळ काढला.
advertisement
कुत्रे बिबट्यावर हल्ला करतात का?
view commentsकुत्र्यांची एक प्रजाती आहे भोटीया, जे खतरनाक शिकारी म्हणून ओळखले जातात. हे कुत्रे प्रामुख्यानं बर्फाच्छेदीत प्रदेशातील डोंगराळ भागात राहतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची रचना ही प्रचंड बलशाली असते. वेळ पडली तर ते वाघाला सुद्धा फाडून टाकू शकतात. अन् त्यामुळे जंगली शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी हिमाचल प्रदेश, काश्मिर, तिबेट वगैरे या भागात राहणारी लोकं आपल्या घरी हे भुटीया कुत्रे पाळतात.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 22, 2025 12:40 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : कुत्र्याच्या तावडीत बिबट्या, केली हुशारीने सुटका, फक्त शिकारच नाही तर शिकारीतून सुटण्याचीही जबरदस्त टेक्निक


