TRENDING:

ऐकावं ते नवल! माहेरच्यांनी नवरीला सोनं आणि पैशांसह दिल्या 100 मांजरी, कारण असं की...

Last Updated:

100 Cats to bride : तसं तुम्ही नवरीसोबत तिचा श्वान किंवा मांजर तिच्या लग्नात आला आणि तो तिच्यासोबतच तिच्या सासरी गेल्याचं पाहिलं असेल पण प्राण्यांची आवड असली तरी 100 मांजरी. वाचूनच आश्चर्य वाटलं असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भारतात हुंड्याची जुनी परंपरा आता बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. पण असे काही देश आहेत, जिथं हुंड्याची परंपरा आहे. असाच एक देश जिथल्या नवरीला तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून सोनं, पैसे तर दिलेच पण सोबत 100 मांजरीसुद्धा दिल्या आहेत. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.
प्रतीकात्मक फोटो (AI Generated image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated image)
advertisement

व्हिएतनाममधील या लग्नाची चर्चा सगळीकडे होते आहे. 22 वर्षांची नवरी जिच्या आईवडिलांनी तिला असा हुंडा दिला की सगळीकडे चर्चा होते आहे. यात 25 सोन्याच्या विटा, 20 हजार डॉलर्स कॅश, 3 लाख व्हिएतनामी डोंग किमतीचे शेअर्स आणि अनेक महागड्या मालमत्तांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर यात तब्बल 100 मांजरी आहेत.

शेवटी तो शेतकऱ्याचा कुत्रा! मालकाप्रमाणे शेतात राबतोय रॉकी, शेती करणाऱ्या कुत्र्याचा VIDEO

advertisement

तसं तुम्ही नवरीसोबत तिचा श्वान किंवा मांजर तिच्या लग्नात आला आणि तो तिच्यासोबतच तिच्या सासरी गेल्याचं पाहिलं असेल पण प्राण्यांची आवड असली तरी 100 मांजरी. वाचूनच आश्चर्य वाटलं असेल. पण या नवरीला दिलेल्या मांजरी साध्या नाहीत तर खास आहेत. या सिव्हेट मांजरी आहेत ज्यांची किंमत सुमारे 70000 अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 58 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

advertisement

सिव्हेट मांजर हा दक्षिण आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागात आढळणारा एक विशेष प्रकारचा प्राणी आहे. या प्राण्याला विशेष मानलं जातं कारण त्याच्या मदतीने जगातील सर्वात महागडी कॉफी कोपी लुवाक बनवली जाते. सिव्हेट मांजर पिकलेली कॉफी चेरी खातो आणि त्याच्या विष्ठेतील बिया स्वच्छ करून कॉफी तयार केली जाते. पिल्लं झालेल्या मादी सिव्हेटची किंमत सुमारे 700 डॉलर आहे, तर प्रेग्नंट सिव्हेटची किंमत 1,050 डॉलरपर्यंत जाते. याशिवाय व्हिएतनाम आणि चीनमध्ये सिव्हेट मांसाचा वापर लक्झरी अन्न आणि चिनी पारंपारिक औषधांमध्ये केला जातो, ज्यामुळे या प्राण्यांचा व्यापार आणखी मौल्यवान होतो.

advertisement

OMG! कधी पाहिलाय का आकाशात उडणारा सिंह? सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय Video

वधूचे वडील होंग ची टॅम म्हणाले की त्यांची मुलगी एका बिझनेस स्कूलमधून शिकली आहे आणि आता ती कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्यास सक्षम आहे. ते म्हणाले, "मी माझ्या मुलीला अशी मालमत्ता दिली आहे जी तिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवू शकते. जर तिला हवं असेल तर ती या सिव्हेट मांजरी वाढवू शकते किंवा त्या विकून आणखी गुंतवणूक करू शकते. हे तिच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे."

advertisement

मात्र सोशल मीडियावर या अनोख्या हुंड्याची चर्चा सुरू आहे. काही लोक याला कौटुंबिक प्रेम आणि आधाराचं उदाहरण म्हणून घेत आहेत, तर काही लोकांनी प्राण्यांच्या व्यापारावर आणि हुंडा पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

मराठी बातम्या/Viral/
ऐकावं ते नवल! माहेरच्यांनी नवरीला सोनं आणि पैशांसह दिल्या 100 मांजरी, कारण असं की...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल