दक्षिण आफ्रिकेतील ही धक्कादायक घटना आहे. हुयगो फरेरा आणि मॉरिन या कपलची अवघ्या 8 दिवसांची मुलगी. मुलीसाठी डायपर आणायला म्हणून मॉरिन घराबाहेर गेली. हुयगो तेव्हा घरात होता. आता आई नसताना त्या मुलीची वडिलांनी काळजी घेणं अपेक्षित होतं. पण हुयगोने मात्र नको तेच कृत्य केलं.
त्याने स्वतःच्या पोटच्या अवघ्या 8 दिवसांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हे वाचूनच तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेली असेल. पण हा नराधम बाप यावरच थांबला नाही, त्याने चिमुकलीला आपटलं. आपटून आपटून तिचा जीव घेतला. मॉरीन परत आली तेव्हा मुलील भयानक जखमी अवस्थेत तिनं पाहिलं आणि हयुगो शांतपणे बसला होता. मॉरीनने मुलीला ताबडतोब रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
advertisement
पती-पत्नी आणि 500 तरुणी! नोएडाच्या घरातील पॉर्न व्हिडीओ, फॉरेनमध्ये पाहत होते लोक
हयुगोला त्याच्या या क्रूर कृत्याबद्दल विचारलं असता, त्याने जे कारण सांगितलं त्याने रागाचा पारा आणखीनंच चझले. पोलीस चौकशीत त्याने सांगितलं की, बाळाला त्याच्यासोबत एकटं सोडल्याने त्याला राग आला होता. त्याने पत्नी मॉरीनला बाळाला दूध पाजण्यासाठी पाच मिनिटांत परत यायला सांगितलं होतं. पण तिला परत यायला उशीर झाला तेव्हा त्याने रागाच्या भरात हे केलं.
तो म्हणाला, मुलीला रडताना पाहायचं होतं, तिला दुखवायचं होतं. म्हणून अशाप्रकारे छळलं की मुलगी सहन करू शकली नाही. मुलगी रडू लागली, ज्यामुळे माझा राग आणखी वाढला. मी मुलीची मान घट्ट पकडली आणि तिला वारंवार मारलं. ज्या डेस्कवर मी काम करतो तिथं तिचं डोकं आपटलं.
म्हणे, 'ही देवाची देणगी'! 66व्या वयात महिला प्रेग्नंट, 10 मुलांना दिला जन्म
मी मान्य करतो हा एक क्रूर आणि भयानक हल्ला होता. विशेषतः इतक्या लहान मुलीला मारहाण करणं चुकीचं आणि बेकायदेशीर होते, पण मी ते जाणूनबुजून केले, अशी कबुली त्याने दिली.
सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. खटल्यादरम्यान आरोपी वेल्व्हर्डियन येथील रेल्वे हाऊसमध्ये त्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षेची वाट पाहत आहे. या सैतानाला मृत्युदंडाची शिक्षाही कमी आहे, असं लोक म्हणत आहेत.