रेडिटवर शेअर केलेल्या स्टोरीत मुलाने सांगितलं की, तो त्याच्या सीए फायनल आणि सीएफएच्या अभ्यासात बिझी होता. तेव्हा त्याला दांडिया नाईट पास मिळाला. त्याने त्याच्या 21 वर्षाच्या गर्लफ्रेंडसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि घरी मित्रांसोबत जात असल्याचं सांगितलं. त्यामुळे खरंतर ती प्रत्यक्षात त्याची सीक्रेट डेट होती. सर्वकाही नीट होतं, पण नशिबाचा वेगळाच प्लॅन होता.
advertisement
रात्री साडेदहाच्या सुमारास तो घरी परतला तेव्हा त्याच्या आईला त्याच्या कपड्यांवर लेडीज परफ्यूमचा सुगंध आला. संशय आल्याने तिने त्याच्या मित्रांना फोन केला आणि त्याचं सीक्रेट समोर आलं. मग त्याच्या बहिणीने तो काही दिवसांपूर्वी एका मुलीशी बोलत असल्याचं सांगितलं. आणि मग काय घरी खरा ड्रामा सुरू झाला.
Mom cried on finding out about my girl
मुलाने सांगितलं, "माझ्या आईने माझा फोन हिसकावून घेतला, आमच्या दोघांचा फोटो पाहिला आणि तिला रडूच कोसळलं. माझ्या वडिलांनी मला कानशिलात लगावली. त्यांनी माझ्या मैत्रिणीचा नंबर मागितला, पण मी तो त्यांना दिला नाही. मला खूप अपमानित वाटलं. मी ठरवलं आहे की जेव्हा मी कमवेन तेव्हा मी माझ्या पालकांसोबत राहणार नाही.
Happy Diwali! दिवाळीच्या मेसेजमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाला, प्रकरण काय?
या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. एका युझरने म्हटलं, "ही प्रत्येक लहान शहरातील मुलाची कहाणी आहे" अनेकांनी लिहिले की भारतात अजूनही कुटुंबांना "प्रेम" आणि "गोपनीयता" या संकल्पना समजून घेण्यासाठी वेळ लागतो.