बॉम्बे IIT ग्रॅज्युएट, 4 कोटी पगार, तरी फ्री बिअर पाहून तोंडाला सुटलं पाणी; त्यानंतर जे केलं, इतरांना लाज वाटली
- Published by:Priya Lad
Last Updated:
IIT graduate with 4 crores salary tempted for free beer : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातील ही घटना. मुंबई आयआयटीमधून पदवीधर झालेला तरुण. त्याने असं कृत्य केलं जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे.
नवी दिल्ली : दारू पिणाऱ्यांची कमी नाही. कित्येक लोकांना दारू पाहिल्यानंतर कंट्रोल होत नाही. असाच एक तरुण जो आयआयटी ग्रॅज्युटल. त्याला तब्बल 4 कोटी रुपये पगार. पण त्याने फ्री बिअर पाहिली आणि मग काय त्याचा त्याच्यावरचा कंट्रोल सुटला. त्यानंतर त्याने जे काही केलं ते पाहून इतरांना लाज वाटली.
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातील ही घटना. मुंबई आयआयटीमधून पदवीधर झालेला तरुण. त्याने असं कृत्य केलं जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. हा तरुण सिलिकॉन व्हॅलीमधील एका एआय स्टार्टअपमध्ये काम करतो आणि दरवर्षी अंदाजे 4.39 कोटी कमावतो, पण विमानातील त्याच्या वागण्याने लोकांना आश्चर्यचकित केलं आहे.
एका टेक कंपनीचे सीईओ गौरव खेत्रपाल यांनी ही संपूर्ण कहाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केली. त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं, "माझ्या शेजारी बसलेला 25 वर्षीय तरुण, जो सिलिकॉन व्हॅलीमध्ये वर्षाला सुमारे अर्धा दशलक्ष डॉलर्स कमवतो तो फ्लाइटमध्ये 11 बिअर प्यायला. जेव्हा क्रू मेंबरने आक्षेप घेतला तेव्हा त्याने आमच्याकडून बिअर घेतली आणि प्यायला सुरुवात केली. इतकी बियर प्यायल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने पँट ओली केली. दुर्गंधीमुळे आम्हाला जागा बदलाव्या लागल्या"
advertisement
"वर्षाला 4 कोटी रुपये कमावणारा माणूस मोफत बिअरसाठी इतका बेशिस्त होतो हे खरोखरच लज्जास्पद आहे. भारतीय प्रवासी स्वतःला असे बदनाम करणे कधी थांबवतील?", असा संताप खेत्रपाल यांनी व्यक्त केला आहे.
On my SFO-Delhi flight today, the passenger next to me was a 25-year old Indian, IIT-Mumbai, earning almost $500K in an AI startup in Bay Area, heading home for Diwali.
During the 16h flight, he gulped down 11 beers. When the flight attendant refused to give him more than 3…
— Gaurav Kheterpal (@gauravkheterpal) October 18, 2025
advertisement
खेतरपाल यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. हजारो लोकांनी यावर कमेंट केल्या. बहुतेकांनी गौर खत्री यांना दोषी ठरवलं. एका युझरने लिहिलं, "फ्लाइट अटेंडंटने नकार दिला तरीही तुम्ही आणि तुमच्या टीमने त्याला बिअर दिली. तूही तितकाच जबाबदार आहेस." दुसऱ्याने लिहिलं, "तू प्रोटोकॉल तोडत होतास. जेव्हा एअर हॉस्टेसने नकार दिला तेव्हा त्याचं एक कारण होतं. भावनेच्या भरात नियम तोडू नकोस." तर काही युझर्सनी कथेच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका व्यक्तीने लिहिलं, "ही कहाणी खोटी वाटते, फक्त एंगेजमेंट वाढवण्यासाठी बनवली आहे."
advertisement
ही स्टोरी रिअल असो वा फेक या 'बीअर गेट'ने सोशल मीडियावर बरीच खळबळ उडवून दिली आहे. लोक म्हणत आहेत, "पैशाने सभ्यता खरेदी करता येत नाही"
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 21, 2025 11:43 AM IST
मराठी बातम्या/Viral/
बॉम्बे IIT ग्रॅज्युएट, 4 कोटी पगार, तरी फ्री बिअर पाहून तोंडाला सुटलं पाणी; त्यानंतर जे केलं, इतरांना लाज वाटली