पोटात 'टिकटिक'! रुग्णाचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले, ताबडतोब सर्जरी

Last Updated:

Stomach Pain : रुग्णाला इतक्या वेदना होत होत्या की त्याला खाणंपिणंही कठीण होत होतं. त्यामुळे त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्या टेस्ट केल्या. रिपोर्टमध्ये त्यांना जे दिसलं त्यावर त्यांचाही विश्वास बसेना. 

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
अजमेर : पोटात वेदना होणं ही बहुतेकांसाठी सामान्य समस्या. पण काहीवेळा याची गंभीर कारणं असू शकतात. एका व्यक्तीच्या पोटातही अशाच वेदना सुरू झाल्या. त्याच्या पोटदुखीचं कारण मात्र खूपच धक्कादायक होतं. पोटदुखीने त्रस्त असलेल्या या व्यक्तीचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले.
राजस्थानच्या जयपूरमधील ही घटना आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयात 9 ऑक्टोबर रोजी एक 34 वर्षांची व्यक्ती पोटदुखीची तक्रार घेऊन आली. रुग्णाला इतक्या वेदना होत होत्या की त्याला खाणंपिणंही कठीण होत होतं. त्यामुळे त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं.
डॉक्टरांनी त्याच्या टेस्ट केल्या. रिपोर्टमध्ये त्यांना जे दिसलं त्यावर त्यांचाही विश्वास बसेना. रुग्णाच्या मोठ्या आतड्यात अनेक नट, बोल्ट आणि लोखंडाचे छोटे तुकडे होते. तसंच घड्याळही अडकलं होतं.
advertisement
सुरुवातीला डॉक्टरांनी एंडोस्कोपीने पोटातील या वस्तू काढण्याचा प्रयत्न केला, ही प्रक्रिया चीराशिवाय केली जाते. पण वस्तूंचं स्वरूप आणि प्रमाण पाहता, हा प्रयत्न अयशस्वी झाला. शेवटी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आणि आतड्यांना होणारे पुढील नुकसान टाळण्यासाठी, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
त्यानंतर सर्जनच्या टीमने हे आव्हानात्मक ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं, जे सुमारे तीन तास चाललं. डॉक्टरांनी पोटात एक छोटासा चीरा टाकला आणि सर्व वस्तू काढल्या. हॉस्पिटलमधून प्रसिद्ध झालेल्या धक्कादायक फुटेजमध्ये डॉक्टर रुग्णाच्या पोटातून घड्याळ आणि इतर धातूच्या वस्तू एक-एक करून बाहेर काढताना स्पष्टपणे दिसत आहेत.
advertisement
सुदैवाने या धोकादायक शस्त्रक्रियेनंतर रुग्ण वेगाने बरा होत आहे आणि त्याच्या जीवाला धोका नाही. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अशा वस्तू सापडण्याची ही पहिलीच घटना नाही. जगभरात असे अनेक दुर्मिळ आणि विचित्र प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
advertisement
तैवानमध्ये 6 महिने वेदना सहन केल्यानंतर डॉक्टरांना झिंग फॅंग ​​नावाच्या 20 वर्षीय महिलेच्या पोटात अडकलेला चार इंचाचा फाउंटन पेन सापडला. त्याचप्रमाणे 2019 मध्ये दक्षिण कोरियामध्ये एका 54 वर्षीय पुरूषाच्या पोटातून दगड, बाटलीच्या टोप्या आणि नाण्यांचा ढीग काढण्यात आला जो चिंता कमी करण्यासाठी गोष्टी खात होता.
view comments
मराठी बातम्या/Viral/
पोटात 'टिकटिक'! रुग्णाचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले, ताबडतोब सर्जरी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement