घराबाहेर खेळत होती मुलगी, तिला पाहताच घाबरली आई; हातात साप आणि खिशात तर...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Girl play with snake : मुलगी बाहेर खेळत होती. अचानक एमीची नजर तिच्यावर पडली आणि एमीला धक्काच बसला. कारण तिच्या मुलीच्या हातात चक्क एक जिवंत साप होता. दुसऱ्या हातावर बेडुक बसला होता. इतकंच नाही तर खिशात...
नवी दिल्ली : लहान मुलं खेळता खेळता काय करतील याचा नेम नाही. कधी एखादी वस्तू उचलून तोंडात, नाकात, कानात टाकतील. काहीतरी तोडफोड करून ठेवतील. अशीच एक मुलगी जिने असं काही केलं की आपण स्वप्नातही विचार केला नसेल. या मुलीने खेळता खेळता चक्क हातात साप धरला. ते पाहून तिची आई घाबरली. त्यानंतर आईने तिने घातलेल्या कपड्यांचे खिसे तपासले तेव्हा तर तिला आणखी धक्का बसला.
अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियातील ही घटना. एमी नावाची ही महिला. तिची लहान मुलगी बाहेर खेळत होती. अचानक एमीची नजर तिच्यावर पडली आणि एमीला धक्काच बसला. कारण तिच्या मुलीच्या हातात चक्क एक जिवंत साप होता. दुसऱ्या हातावर बेडुक बसला होता. इतकंच नाही तर यानंतर एमीने मुलीचे खिसे तपासले. तेव्हा तर ती पुरती हादरली. कारण तिने खिशातही बेडुक आणि साप ठेवले होते.
advertisement
एमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट mama_and_johnnys_daily_play वर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये एमीने विचारलं की, "तुझ्या खिशात किती प्राणी आहेत?"
advertisement
जॉनी अभिमानाने तिचे दोन्ही हात पुढे करते, एका हातात बेडूक आणि दुसऱ्या हातातील साप दाखवते. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं की हा साप एक सामान्य गार्टर साप आहे जो माणसांसाठी धोकादायक नाही. एमी सुरुवातीला हसते नंतर काळजीपूर्वक तिच्या मुलीचे खिसे बघते आणि तिथे तिला जे आढळते ते सर्वांना आश्चर्यचकित करते. दुसरा साप तिच्या मोठ्या खिशात होता, तर दोन्ही बाजूंच्या खिशातही लहान साप होते. एकूण जॉनीने तिच्या खिशात तीन साप आणि एक बेडूक पाळीव प्राणी म्हणून ठेवले होते.
advertisement
व्हिडिओमध्ये एमी हसत तिच्या मुलीला विचारते, "मी साप धरू शकते का?" जॉनी लगेच उत्तर देते "हो, मम्मी, हे घे" आणि खिशातून साप काढत तिच्या आईला देते. हसत एमी सापाला धरते आणि म्हणते, "नक्कीच, मला आवडेल."
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 20, 2025 9:07 AM IST