TRENDING:

Viral Video : दागिने चोरण्यासाठी आली महिला, मात्र दुकानदाराने शिकवला चांगलाच धडा

Last Updated:

चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसाढवळ्या, रात्री, दुपारच्या वेळी कोणत्याही ठिकाणी चोरी घडत असते. अनेकदा पुरुषांपेक्षा महिला चोरी करण्याच्या घटना अधिक आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसाढवळ्या, रात्री, दुपारच्या वेळी कोणत्याही ठिकाणी चोरी घडत असते. अनेकदा पुरुषांपेक्षा महिला चोरी करण्याच्या घटना अधिक आहेत. अगदी बेधडकपणे महिला चोरी करतात. याच्या बऱ्याच घटना समोरही आल्या आहेत. काही घटनांचे सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलेत. सध्या समोर आलेली चोरीची घटना अशीच काहीशी आहे. महिला सोन्याच्या दुकानात चोरी करताना तिचा व्हिडीओ समोर आलाय.
दागिने चोरणाऱ्या महिलेला दुकानदाराने शिकवला धडा
दागिने चोरणाऱ्या महिलेला दुकानदाराने शिकवला धडा
advertisement

महिला सोन्याच्या दुकानात चोरी करण्याच्या हेतूने घुसते. मात्र चोरी करणारच तेवढ्यात तिचा डाव फसतो आणि दुकानदार तिला चांगलाच चोप देतो. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Shocking News: लग्नाच्या 20 वर्षानंतर समोर आलं सत्य, बहिण नवऱ्यासोबत वागत होती विचित्र

समोर आलेल्या चोरीच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला बॅग घेऊन दागिन्यांच्या दुकानात आल्याचं दिसत आहे. ती दुकानदाराशी बराच वेळ बोलते आणि दागिने दाखवायला सांगते. ती महिला चोर असू शकते याची दुकानदाराला कल्पना नव्हती. तो महिलेला दागिन्यांच्या वस्तू टेबलावर ठेवत दाखवत होता. दुकानदाराचे लक्ष काही क्षणासाठी विचलित होताच महिलेनं पर्समधून मिरचीचा स्प्रे काढून दुकानदाराच्या डोळ्यात फवारला.

advertisement

टेबलावरचे दागिने घेऊन महिला पळ काढणारच तेवढ्यात दुकानदार पुढे सरसावतो आणि टेबलवरचा बॉक्स तिला मारतो. तो तिला पकडतो आणि बेदम चोप देतो. @cctvidiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, ही घडलेली घटना कोणत्या ठिकाणची आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाही. व्हिडीओवर सध्या भरपूर कमेंट येताना दिसतेय. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

मराठी बातम्या/Viral/
Viral Video : दागिने चोरण्यासाठी आली महिला, मात्र दुकानदाराने शिकवला चांगलाच धडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल