Shocking News: लग्नाच्या 20 वर्षानंतर समोर आलं सत्य, बहिण नवऱ्यासोबत वागत होती विचित्र
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लग्न झाल्यानंतर फक्त दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंबही एकत्र येतात. त्यामुळे बऱ्याचदा एकमेकांची मनराखण करता करताना अनेक भांडण, वाद होताना पहायला मिळतात.
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : लग्न झाल्यानंतर फक्त दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंबही एकत्र येतात. त्यामुळे बऱ्याचदा एकमेकांची मनराखण करता करताना अनेक भांडण, वाद होताना पहायला मिळतात. तर काही लोकांची सत्य हळूहळू बाहेर येऊ लागतात. एका महिलेसोबत असंच काहीसं झालं तिला लग्नाच्या 20 वर्षानंतर नवऱ्याचं आणि बहिणीचं एक सत्य कळलं. तिला तर धक्काच बसला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
महिलेला लग्नाच्या 20 वर्षांनंतर समजलं की, बहिण तिच्या नवऱ्याला नावाने हाक मारत नव्हती, तिचं वागणं नवऱ्यासोबत एकदम विचित्र होतं. ती त्याचा आदर करत नव्हती आणि सतत थट्टा मस्करी करायची.
मिरर यूकेच्या वृत्तानुसार, महिलेनं सांगितलं, तिच्या पहिल्या पतीच्या नावाने तिची बहिण तिच्या दुसऱ्या नवऱ्याला हाक मारत होती. हे खूप विचित्र असून त्याची कायमत थट्टा मस्करी करायची. याविषयी तिला विचारल्यावर तिनं सांगितलं की नातं चांगलं व्हावं यासाठी ती हे करत होती. महिलेनं याविषयी reddit वर पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट भरपूर व्हायरल झाली आणि लोकांच्याही भरपूर कमेंट आल्या.
advertisement
दरम्यान, कोण कधी कोणाविषयी काय विचार करतं याविषयी कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा लोक एकमेकांचा तिरस्कार करतात, वाईट विचार ठेवतात आणि असं दाखवतात की आम्ही असं काही करत नाही. अशा अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 24, 2023 7:57 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Shocking News: लग्नाच्या 20 वर्षानंतर समोर आलं सत्य, बहिण नवऱ्यासोबत वागत होती विचित्र









