TRENDING:

स्वतःच्या लग्नात मेहुणीने दाजीसोबत दिली अशी पोझ, फोटो पाहून पोलीसही हादरले, होणार अटक

Last Updated:

मेहुणीच्या लग्नाला भावोजी आला होता. यावेळी मेहुणीनं असं काही केलं की भावोजी अडचणीत सापडला आहे. मेहुणीने दाजींसोबत फोटो काढला. हा फोटो व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पाटणा : मेहुणी आणि दाजी यांचं नातंच वेगळं असतं. साली आधी घरवाली, असं म्हणतात. असेच एक दाजी आणि मेहुणी सध्या चर्चेत आले आहेत. मेहुणीच्या लग्नाला भावोजी आला होता. यावेळी मेहुणीनं असं काही केलं की भावोजी अडचणीत सापडला आहे. मेहुणीने दाजींसोबत फोटो काढला. हा फोटो व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. फोटो पाहून पोलीसही हादरले. याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे.
मेहुणी आणि दाजी
मेहुणी आणि दाजी
advertisement

बिहारच्या मोतिहारीमधील हे प्रकरण आहे. भारत-नेपाळ सीमा भागातील झरोखर पोलीस ठाण्यातील बाघा गावात हा लग्नसबोळा होता. बाळापूरचे रहिवासी पीएसीएस अध्यक्ष अभय सिंह यांच्या मेहुणीचं हे लग्न. लग्नाला ते गेले. तेव्हा त्यांच्याकडे परवानाधारक शस्त्र बंदूक होती.

बायकोसोबत हसत-हसत महाकुंभात गेला, एकत्र मारली डुबकी, पाण्याबाहेर रडत आला नवरा, घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अभय सिंह यांनी आपली बंदूक मेहुणीच्या लग्नात मेहुणीच्या हातात दिली. मेहुणीने पिस्तूल हातात धरून दाजींसोबत पोझ देत फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. फोटोत ती शस्त्र दाखवताना दिसली. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. फोटो पोलिसांपर्यंत पोहोचला. एसपी स्वर्ण प्रभात यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

advertisement

झारोकहार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शस्त्रं जप्त केली आहेत आणि तिघांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यात दाजी, मेहुणी आणि फोटो काढणाऱ्याचा समावेश आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, आरोपीला अटक केली जाईल आणि सर्व तथ्ये तपासली जातील. या शस्त्रांच्या परवान्यांबद्दलही चौकशी केली जाईल.

बंदुक लायसन्स कोणाला मिळतं? कशी असते प्रोसेस?

अनेकदा लोकांच्या जीवाला धोका असतो. वाद किंवा कोणासोबत भांडण यामुळे अनेदा लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असतात. त्यामुळे लोक बंदुकीचा परवाना काढतात. भारतात प्रत्येकाला बंदुक सोबत ठेवण्याची परवानगी मिळत नाही. यासाठी सरकारचे काही नियम, अटी आहेत.  भारतातील आर्म्स एक्टनुसार, 1959 अंतर्गत बंदुकीचं लायसन्स मिळवण्याच्या अनेक अटी आहेत.

advertisement

Driving करताना तरुणाच्या मांडीवर बसली तरुणी, कंट्रोल सुटलं अन् भयंकर घडलं Video Viral

1) बंदुकीचं लायसन्स आत्मरक्षणासाठी दिलं जातं. लायसन्ससाठी तुमचं वय 21 वर्षाच्या वर हवं.

2) तुम्ही भारताचे नागरिक असल्यावरच तुम्हाला बंदुकीचं लायसन्स मान्य केलं जाईल. याशिवाय तुमच्यावर कोणता मोठा गुन्हा दाखल नसला पाहिजे.

3) स्वरक्षासाठी बंदुक वापरताना तुम्ही शारिरीकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फीट पाहिजे.

advertisement

4) तुमच्यावर कुठली सरकारी जबाबदारी नसावी. तुमचा जीव कसा आणि कशामुळे धोक्यात आहे याविषयी सांगणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या/Viral/
स्वतःच्या लग्नात मेहुणीने दाजीसोबत दिली अशी पोझ, फोटो पाहून पोलीसही हादरले, होणार अटक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल