TRENDING:

शरीराच्या फक्त त्या पार्टवर लक्ष ठेण्यासाठी महिलेने ठेवला ट्रेनर, महिन्याला 3 लाख पगार

Last Updated:

काही दिवसांपूर्वी प्लेबॉय ऑस्ट्रेलियाने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने सर्वात परफेक्ट फिमेल बॉडी असलेल्या महिलेची ओळख पटवली. एआयने या महिलेला परफेक्ट बॉडी असलेल्या महिलेची पदवी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आजकाल लोक फिटनेस फ्रिक झाले आहेत. यासाठी काही लोक जीममध्ये जातात, डाएट फॉलो करतात. कित्येक लोक तर पर्सनल फिटनेस ट्रेनरही ठेवतात. पण काही लोकांना फिटनेसची इतकी क्रेझ असते की ते काहीही करतात.अशीच फिटनेसची क्रेझ असलेली ब्राझीलची मॉडेल. तिने फक्त आपल्या शरीराच्या एका खास पार्टवर लक्ष ठेवण्यासाठी पर्सनल ट्रेनर ठेवला आहे. ज्याला ती दर महिन्याला तब्बल 3 लाख रुपये पगार देते.
फोटो : Instagram/karolrosalin
फोटो : Instagram/karolrosalin
advertisement

कॅरोल रोसालिन असं या मॉडेलचं नाव आहे. 25 वर्षांची कॅरोल ब्राझीलच्या साओ पाऊलोमध्ये राहते. कॅरोल रोसालिन ही ब्राझीलची प्रभावशाली आणि मॉडेल आहे.  डेली मेलच्या रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी प्लेबॉय ऑस्ट्रेलियाने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने सर्वात परफेक्ट फिमेल बॉडी असलेल्या महिलेची ओळख पटवली. एआयने रोझलिनला सर्वात परफेक्ट बॉडी असलेल्या महिलेची पदवी दिली.

जबरदस्त! हा 41 वर्षीय व्यक्ती 'काहीही न करता' कमवतो 69 लाख रुपये, पण कसे?

advertisement

द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार,  रोझलिनने नीड टू नो नावाच्या वेबसाइटशी बोलताना सांगितलं की, तिने फिटनेस ट्रेनरची नियुक्ती केली आहे, जो फक्त तिच्या हिपची काळजी घेतो आणि त्याला साइझमध्ये ठेवण्यासाठी काम करतो. रोझलिनला तिचे हिप आकारात ठेवणं इतकं आवडतं की ती दर महिन्याला तिच्या ट्रेनरला 3 लाख रुपये देते.

तिचे नितंब चांगले ठेवण्यासाठी, ती दर आठवड्याला 2500 स्क्वॅट करते. तिचा ट्रेनर तिच्या वर्कआउटवर लक्ष ठेवतो आणि तिला दररोज अनेक सिट-अप करण्यात मदत करतो. जेव्हा ती जिममध्ये जाते, काही दिवस ती फक्त स्क्वॅट करते आणि इतर दिवशी ती वेट ट्रेनिंग करते. जिमसोबतच ती खाण्यापिण्याचीही खूप काळजी घेते. तिला विश्वास आहे की पर्सनल ट्रेनर नियुक्त करून ती लवकरात लवकर तिला हवी तशी साइझ मिळवू शकते.

advertisement

Chanakya Niti : बायको नाही म्हणणारच नाही; नवऱ्यांनो फक्त 'हे' करा

आपल्या एआय पुरस्काराबाबत भाष्य करताना ती म्हणाली, आता हा पुरस्कार मिळाल्यानंतर ती आणखी मेहनत करण्याचा प्रयत्न करत आहे. असा फिटनेस मिळवण्यासाठी तिला तिच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडेही खूप लक्ष द्यावं लागतं. ती चिकन, मासे, कार्बोहायड्रेट जसं की ओट्स, धान्यं तसंच भरपूर हिरव्या भाज्या आणि फळं खाते.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
शरीराच्या फक्त त्या पार्टवर लक्ष ठेण्यासाठी महिलेने ठेवला ट्रेनर, महिन्याला 3 लाख पगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल