TRENDING:

ऐका, ऐका, ऐका! एक तास दारू FREE!! कित्येकांच्या आवडीची घोषणा, तरी भडकले लोक; पण का?

Last Updated:

Free Liquor Announcement : दारूबाबत लाऊडस्पीकरवरून करण्यात आलेल्या या घोषणेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच गोंधळ उडाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : काय सांगता फ्री दारू... वाचूनच कित्येक तळीरामांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. फ्री दारू कुठे मिळते आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल खरंतर फ्री दारूची ही घोषणा ऐकल्यानंतर कित्येक लोक भडकले आहेत. आता यामागील नेमकं कारण काय आहे? ते पाहुयात.
News18
News18
advertisement

31 ऑक्टोबर रोजी झालेली ही घोषणा... लाऊडस्पीकरून फ्री दारूची घोषणा ऐकू आली. एका तासासाठी दारू फ्री अशी ही घोषणा. सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत मोफत दारू. दारूबाबत लाऊडस्पीकरवरून करण्यात आलेल्या या घोषणेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच गोंधळ उडाला. काही लोकांनी दारूसाठी गर्दी केली तर काहींनी संताप व्यक्त केला. यानंतर प्रशासनालाही याबाबत कारवाई करावी लागली.

advertisement

40000000000 रुपयांचा घोटाळा! मल्ल्या आणि नीरवचाही बाप निघाला बंकीम, बँकेत अशी फेरफार, डोकं चक्रावून जाईल

उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही घोषणा. या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नसली तरी, राजकीय वातावरण तापलं आहे. गावाचं प्रधान होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांनी आधीच जोमाने प्रचार सुरू केला आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.रस्त्याच्या कडेला लावलेले फ्लेक्स, पोस्टर्स आणि बॅनर, प्रचार वाहने किंवा घरोघरी संपर्क असो, प्रचारक सर्व प्रकारच्या युक्त्या वापरत आहेत.

advertisement

दरम्यान बिजनोरच्या एका उमेदवाराने मतदारांना आकर्षित करण्यासाठी वादग्रस्त पाऊल उचललं. त्याने तासभर मोफत दारूची घोषणा केली. प्रकरण तिथंच संपत नाही. असं म्हटले जात आहे की मोफत दारूची घोषणा शिवमंदिरातून करण्यात आली होती, ज्यामुळे वाद निर्माण झाला.

कुली नंबर 1, सोबत 2 बॉडीगार्ड! रिल नाही हे रिअल आहे; 200 रुपये कमवणाऱ्या कुलीला अंगरक्षक का?

advertisement

ग्रामस्थ आणि इतर उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त उमेदवारांनी तात्काळ नजीबाबाद उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आणि किरतपूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करून कारवाईची मागणी केली. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मतदारांवर प्रभाव पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं. मंदिराचे सेवक धर्मवीर सिंग यांनी 50 रुपयांची लाच घेतल्यानंतर ही घोषणा केल्याचं तपासात समोर आलं.

advertisement

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांनी आपली चूक मान्य केली आणि पोलिसांकडे माफीनामा सादर केला. पोलिस स्टेशन प्रभारी पुष्पा देवी यांनी सांगितलं की, पुजाऱ्याची माफी स्वीकारण्यात आली आहे आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या संभाव्य गावप्रमुख उमेदवारावर कठोर कारवाई केली जाईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

(सूचना : हा लेख फक्त बातमी म्हणून देण्यात आला आहे. न्यूज18मराठी दारूचं समर्थन करत नाही, दारू पिण्यास प्रोत्साहन देण्याचा उद्देश न्यूज18मराठीचा नाही.)

मराठी बातम्या/Viral/
ऐका, ऐका, ऐका! एक तास दारू FREE!! कित्येकांच्या आवडीची घोषणा, तरी भडकले लोक; पण का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल