कुली नंबर 1, सोबत 2 बॉडीगार्ड! रिल नाही हे रिअल आहे; 200 रुपये कमवणाऱ्या कुलीला अंगरक्षक का?

Last Updated:

Coolie With Bodyguards : एखादा फिल्मी सीन वाटावा असं हे दृश्य पण ते रिअल आहे. या कुलीसोबत बॉडीगार्डला पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. एका साध्या कुलीसोबत बॉडीगार्ड का? असा प्रश्न सगळ्यांना पडतो. 

News18
News18
पाटणा : तुम्ही आजवर राजकीय नेते, बडेबडे स्टार्स, सेलिब्रिटींचे बॉडीगार्ड पाहिले असतील. पण एक साधा कुली जो दिवसाला फक्त 200 रुपये कमवतो, त्याच्यासोबतही बॉडीगार्ड. तेसुद्धा दोन-दोन. हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. नेमका का कुली कोण? आणि त्याच्यासोबत बॉडीगार्ड का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल.
धरम यादव उर्फ ​​धर्मनाथ यादव नावाचा हा कुली. 50 वर्षांचा धरम बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील आरा येथील राहणारा आहे. 1989 पासून तो पाटणा जंक्शनवर कुली नंबर 1 म्हणून काम करत आहे. तो दिवसभर प्लॅटफॉर्म नंबर 1 ते 10 पर्यंत धावतो, प्रवाशांच्या बॅगा आणि सामान वाहून नेतो. तो दिवसाला फक्त 200 ते 300 रुपये कमवतो. पण तो एकटा नसतो, त्याच्यासोबत असतात त्याचे दोन बॉडीगार्ड. एखादा फिल्मी सीन वाटावा असं हे दृश्य पण ते रिअल आहे. या कुलीसोबत बॉडीगार्डला पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. एका साध्या कुलीसोबत बॉडीगार्ड का? असा प्रश्न सगळ्यांना पडतो.
advertisement
ही कहाणी 27 ऑक्टोबर 2013 पासून सुरू होते. त्या दिवशी तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र मोदी (आता पंतप्रधान) यांची हुंकार रॅली पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानात आयोजित करण्यात आली होती. शेकडो लोक जमले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक अर्धा डझनहून अधिक बॉम्बस्फोट झाले, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. 7 जण ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. मोदी थोडक्यात बचावले.  हे इंडियन मुजाहिदीन आणि त्याच्याशी संबंधित संघटनांचे कट होते, हे गुप्तचर यंत्रणांनी नंतर उघड केलं.
advertisement
बॉम्बस्फोटानंतर झालेल्या धावपळीत धर्म यादव गर्दीत होता. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयास्पद माणसाला पाहिलं. कोणताही विचार न करता धर्माने त्याला पकडलं. तो माणूस मोइनुद्दीन नावाचा दहशतवादी असल्याचं निष्पन्न झालं, जो बॉम्बस्फोटात सहभागी होता. धर्माने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या शौर्यासाठी तत्कालीन बिहार सरकार आणि केंद्र सरकारने त्याचा सन्मान केला. पंतप्रधान मोदींनी स्वतः त्याचे आभार मानले. पण त्यानंतर तो दहशतवाद्यांचे लक्ष्य बनला आणि त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. त्यानंतर बिहार पोलिसांनी धर्माच्या सुरक्षेसाठी दोन कॉन्स्टेबलला अंगरक्षक म्हणून तैनात केले.
advertisement
स्टेशनवरील लोक त्याला हिरो कुली म्हणत. पण धर्माच्या कथेत नंतर एक वेगळा अध्याय जोडला गेला आहे. 3 ऑगस्ट 2025 रोजी पाटणा जंक्शनवर एक घटना घडली ज्याने संपूर्ण बिहार राज्य हादरवून टाकलं. धर्माचा आरपीएफच्या एका महिला उपनिरीक्षकाशी वाद झाला. त्याने अधिकाऱ्याला धमकी दिली, "मी तुला अटक करेन." हे संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं. आरपीएफने ताबडतोब कारवाई केली आणि धर्माला अटक केली. भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (गुन्हेगारी धमकी) आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तो न्यायालयात हजर झाला आणि आता जामिनावर आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
कुली नंबर 1, सोबत 2 बॉडीगार्ड! रिल नाही हे रिअल आहे; 200 रुपये कमवणाऱ्या कुलीला अंगरक्षक का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement