गुगल जेमिनी एआयचा साडी ट्रेंड, एका तरुणीने फॉलो केला. पण या तरुणीला भयानक अनुभव आला. तिने जेव्हा एआय जनरेटेड आपला फोटो पाहिला तेव्हा ती घाबरली. फोटोत असं काही दिसलं की कुणीच स्वप्नातही विचार केला नसेल. तरुणीने याबाबत सोशल मीडियावर सांगितलं आहे. तिने व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि सगळ्यांना सावध केलं आहे. असं या फोटोत काय दिसलं?
advertisement
झलक भवनानी नावाची ही इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे. जी व्हिडीओत तिच्या एआय बद्दलच्या सर्वात भयानक अनुभवांबद्दल सांगत आहे. काही दिवसांपूर्वी तिने स्वतःचा एक फोटो जेमिनीला तयार करण्यासाठी दिला. तिने जेमिनीला इन्स्टाग्रामवर एआय साडी ट्रेंड फॉलो करण्यास सांगितलं.
झलकने जेमिनीला दिलेल्या फोटोमध्ये तिने फूल सील्व्हचा सूट घातला होता. एआयने तिला फोटो दिला तेव्हा तो काळ्या साडीत दिला. ज्यात तिचा ब्लाऊज स्लीव्हलेस होता. इथपर्यंत ठिक पण जेव्हा तिने आपला हात पाहिला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डाव्या हातावर तीळ होता.
पण झलकने आपला फूल सील्व्हचा फोटो दिला होता मग एआयला तिच्या डाव्या हातावरील काळा तीळ कसा दिसला? एआयने आपल्या प्रायव्हेसीवर आक्रमण केलं आहे का? फोटो पाहून ती घाबरली. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. एका युझरने आपल्यासोबतही असंच घडल्याचं सांगितलं आहे. तो म्हणाला, मी दिलेल्या फोटोत टॅटू दिसत नव्हता पण एआयने तयार केलेल्या फोटोत तो दिसत होता.
Couple Photo Trend : पार्टनरसोबत भर पावसात रोमॅन्टिक फोटो, तुम्हालाही हवाय? Gemini ला द्या हा Prompt
तर एका युझरने सांगितलं की, जेमिनी हा गुगलचा एक भाग आहे आणि तो इंटरनेटवर अपलोड केलेल्या तुमच्या जुन्या फोटो आणि व्हिडिओंमधून माहिती घेऊन नवीन प्रतिमा तयार करतो.
अनेकांनी यामागील तांत्रिक कारणंदेखील दिली आहेत. त्यांचं म्हणणं आहे की एआय केवळ अपलोड केलेल्या फोटोंवर अवलंबून नाही. ते तुमच्या डिजिटल इतिहासातील माहिती, मागील अपलोड आणि ऑनलाइन फोटोंमधील माहिती देखील एकत्रित करू शकतं. म्हणूनच फोटो अधिक वास्तववादी दिसतात.