स्कॉटलंडमधील ही घटना आहे. एका तरुणीसोबत जे घडलं ती ब्रेकअपची सामान्य स्टोरी नाही तर नशीबाचा खेळ आहे, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. चिटर बॉयफ्रेंडशी ब्रेकअप केल्यानंतर गर्लफ्रेंडचं नशीब फळफळलं आहे. तिला 10000 पौंड म्हणजे सुमारे 10 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. आता हे कसं काय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
ही ब्रेकअप स्टोरी गर्ल्स ओव्हरहर्ड नावाच्या एका लोकप्रिय पॉडकास्टमध्ये सांगण्यात आली. होस्ट एलिध वेल्सने एका अनामिक श्रोत्याने पाठवलेली ही कहाणी वाचली.
महिलेने सांगितल्यानुसार तिचा बॉयफ्रेंड क्लोज फ्रेंड्सना रोमँटिक मेसेज पाठवत असल्याचं समजलं. याबाबत तिने त्याला विचारलं तेव्हा त्याने ते मान्यच केलं नाही. पण आता हे नातं संपवलेलंच बरं असं तिने ठरवलं आणि तिने ब्रेकअप केलं.
ब्रेकअपनंतर ती तिच्या वस्तू घेण्यासाठी त्याच्या घरी गेली. योगायोगाने तो तिच्या वाढदिवसाच्या आधीचा दिवस होता. ती जेव्हा बॉयफ्रेंडच्या घरी गेली तेव्हा त्याने तिला तिच्या सामानाची मोठी बॅग दिलीच पण सोबत बर्थडे कार्ड आणि गिफ्टही दिलं. त्याला वाटलं यामुळे कदाचित तिचं मन बदलेल आणि ती ब्रेकअप करणार नाही. पण तसं झालं नाही.
सुहागरातसाठी आसुसलेली, पण नवऱ्याने नको तेच केलं, नवरीने सगळं सगळं सांगितलं, काय घडलं?
तरुणी गिफ्ट घेऊन घरी गेली आणि तिने ते उघडून पाहिलं. त्यात एक लॉटरी स्क्रॅच कार्ड होतं. तिनं ते स्क्रॅच केलं आणि तिला धक्काच बसला. ती तब्बल 10000 पौंड म्हणजे 11 लाख रुपये जिंकली होती.
त्यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडला मेसेज करून आभार मानले. नंतर त्याच्याशी ती कधीच बोलली नाही असं तिनं सांगितलं. हे पैसे तिने तिच्या नवीन घराच्या डाऊन पेमेंटसाठी वापरल्याचं ती म्हणाली.