सुहागरातसाठी आसुसलेली, पण नवऱ्याने नको तेच केलं, नवरीने सगळं सगळं सांगितलं, काय घडलं?

Last Updated:

Wedding First Night Story : . लग्नाच्या पहिल्या रात्री वधू तिच्या पतीकडे प्रेमाने पाहते आणि हळू हळू त्याच्या जवळ बसते. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं पण नंतर...

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
लखनऊ : लग्न झाल्यानंतर प्रत्येक कपलला प्रतीक्षा असते ती सुहागरात म्हणजे लग्नाच्या पहिल्या रात्रीची. अशीच एक नवरी जी सुहागरातसाठी आसुसली होती. बेडरूममध्ये बेडवर बसून ती आपल्या नवरदेवाची वाट पाहत होती. नवरदेव खोलीत आला. पण तो असं काही करू लागला की नवरीने कल्पनाही केली नव्हती. नवरदेवाचं कृत्य पाहून नवरीबाईला धक्का बसला. ती किंचाळली आणि तिने थेट माहेरी फोन लावला.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हे प्रकरण आहे. रावतपूर येथील रहिवासी असलेल्या महिलेचं लग्न मार्च 2024 मध्ये उन्नाव जिल्ह्यातील एका तरुणाशी झालं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री वधू तिच्या पतीकडे प्रेमाने पाहते आणि हळू हळू त्याच्या जवळ बसते. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं पण नंतर वधूने तिच्या वराचा हात धरताच तो तिचा हात झटकून टाकतो आणि भडकतो. लग्नाच्या पहिल्याच रात्री महिलेला समजलं की तिचा पती नपुसंक आहे.
advertisement
तिने दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या मोठ्या जावेला याबाबत सांगितलं, पण तिने ते मस्करीत घेतलं. काही दिवसांनी महिलेने पुन्हा हा विषय काढला तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. महिलेच्या म्हणण्यानुसार, सासरच्यांनी कबूल केलं की त्यांना आधीच सर्व काही माहित होतं आणि हे लग्न फक्त हुंड्यासाठी केलं गेलं होतं.
advertisement
जेव्हा महिला तिच्या पतीवर उपचार करण्याबद्दल बोलली तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिच्याकडून 2 लाख रुपयांची मागणी केली. महिलेला आशा होती की परिस्थिती सुधारेल, म्हणून ती तिथंच राहू लागली. पण तिच्या दीराची तिच्यावर वाईट नजर होती. त्याने तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला तेव्हा तिला बेदम मारहाण करण्यात आली.
advertisement
महिलेने आरोप केला आहे की जेव्हा तिला तिच्या माहेरच्यांनी बोलण्यासाठी बोलावलं, तेव्हा तिला फाशी देण्याचा प्रयत्न करण्यात आला जेणेकरून प्रकरण सोडवण्याऐवजी तिला संपवता येईल. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी पती, दीर आणि जावेविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
सुहागरातसाठी आसुसलेली, पण नवऱ्याने नको तेच केलं, नवरीने सगळं सगळं सांगितलं, काय घडलं?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement