फेणी म्हणजे काय?
फेणी ही काजूच्या फळाच्या रसाचं फर्मेंटेशन आणि डिस्टिलेशन करून बनवलेली पारंपरिक गोवन दारू. यात कोणताही कृत्रिम फ्लेवर नसतो. ‘फेणी’ हे नाव संस्कृत ‘फेना’ म्हणजेच फेस या शब्दावरून आलं आहे. कारण ती हलवली की तिच्यावर हलका फेस उठतो. फेणीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ती पिण्यास सुरक्षित आहे, हँगओव्हर होत नाही आणि तिचा सुगंध खूप स्ट्रॉंग आणि वेगळा असतो.
advertisement
गोव्याच्या ओळखीचा भाग असलेल्या फेणीला 2009 मध्ये GI टॅग मिळाला आणि 2016 पासून तिला हेरिटेज ड्रिंक मानलं जाऊ लागलं.
गोव्यात फेणीची सुरुवात कशी झाली?
सुमारे 400-500 वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी भारतात काजूचं झाड आणलं. त्यापूर्वी गोव्यात नारळ फेणी लोकप्रिय होती. पहिल्यांदा फेणीचा उल्लेख 1584 मध्ये डच व्यापारी जान ह्यूगेन वॅन लिन्शोटेन यांच्या डायरीत आढळतो. आज गोव्यात दोन प्रकारच्या फेणी लोकप्रिय आहेत काजू फेणी, नारळ फेणी. गोव्यात फेणी ही केवळ दारू नाही, तर पूर्वी ती औषध म्हणूनही वापरली जात होती. अदरक, जिरे वगैरे मिसळून बनवलेली फेणी पोटदुखी, सांधेदुखी आणि सर्दीसाठी उपयुक्त मानली जायची.
काजू रसाच्या पहिल्या डिस्टिलेशनला उर्रक म्हणतात, ज्याचं सेवन मार्च-एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात केलं जातं. आज गोव्याच्या बार, रेस्टॉरंट, बीच-शॅक्स, स्थानिक उत्सव जिथे जिथे गोवानी संस्कृती आहे, तिथे तिथे फेणीही आहे.
फेणी बनते कशी?
फेणी तयार करण्याची प्रक्रिया अजूनही बहुतांश ठिकाणी पारंपरिकच आहे.
- काजूफळ चिरडणे
टेकडीवरील दगडी पट्ट्यावर हाताने फळं चिरडली जातात. रस गोळा करणे – हा रस मोठ्या मडक्यांमध्ये किंवा तांब्याच्या भांड्यात साठवला जातो.
-फर्मेंटेशन
भांडी जमिनीत गाडून नैसर्गिकरित्या फर्मेंट होऊ दिलं जातं.
-डिस्टिलेशन करताना देखील त्यातून वेगवेगळे ड्रिक्स तयार होतात.
पहिला डिस्टिलेट: उर्रक
दुसरा: काझुलो
तिसरा आणि अंतिम: फेणी मध्ये रुपांतरीत होतो. फेणीमध्ये 43-45% अल्कोहोल असतं. तिची सुगंधी ताकद आणि तीक्ष्ण चव हीच तिची ओळख आहे.
फेणी ही शरीर गरम ठेवणारी मानली जाते. यामुळे सर्दी-खोकला सुधारतो, श्वसनमार्ग स्वच्छ करतो, पचन सुधारतं अर्थात, हे सर्व फायदे मर्यादित प्रमाणात घेतल्यावरच लागू होतात.
जीआय टॅगचे महत्त्व
2009 मध्ये मिळालेल्या GI टॅगनुसार फक्त गोव्यात तयार होणारी फेणीच ‘फेणी’ म्हणून legally ओळखली जाईल. जसं स्कॉटलंडचं व्हिस्की म्हणजेच स्कॉच मानलं जातं, तसंच गोव्यातील फेणीच खरी फेणी. राज्य सरकारनं तिला हेरिटेज ड्रिंक घोषित केल्यापासून तिची आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी वाढली आहे.
फेणीची लोकप्रियता पर्यटकांमुळे मोठी आहे. गोव्यातील 4,000 पेक्षा जास्त मायक्रोब्रुअरीज तिच्या उत्पादनात गुंतलेल्या आहेत. भारतीय ग्राहक आता तिचा वेगळा स्वाद स्वीकारू लागले आहेत, त्यामुळे बाजार वाढत आहे.
