TRENDING:

सहा वर्षांचं प्रेम, एक दिवसाचं लग्न... नवरदेव फोटो सेशनमधूनच झाला गायब; मेहुणीनं टाकलं प्रेमाचं जाळं आणि...

Last Updated:

कायलीने रेडिओ शोमध्ये तिच्या लग्नाची धक्कादायक कहाणी सांगितली. सहा वर्षं रिलेशनशिपनंतर तिचं लग्न झालं, पण फोटोंच्या शुटींगनंतर नवरा गायब झाला. रिसेप्शन नवऱ्याशिवाय...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आयुष्यात काही घटना अशा घडतात की, त्याचं दुःख शेवटपर्यंत राहतं. ते विसरताही येत नाही आणि लपवताही येत नाही. अशीच एक घटना एका महिलेच्या बाबतीत घडली आहे. तिचं एकावर 6 वर्षांपासून होतं. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. त्यांनी लग्न करायचं ठरवलं. लग्नही ठरलं. त्या लग्नात दोघेही आनंदी दिसत होते. तिचा नवरा चेहऱ्यावर कसलेही भाव न दाखवता सर्वांसोबत फोटोही काढत होता. पण त्याच दिवशी ऐन लग्नात तो 6 वर्षांचं प्रेम सोडून बायकोच्या बहिणीसोबत निघून गेला. या महिलेचं फक्त 24 तास लग्न टिकलं... चला तर सविस्तर घटना पाहुया...
24-hour marriage
24-hour marriage
advertisement

"माझं लग्न फक्त 24 तास टिकलं", हे आहे एका महिलेचं विधान, जिचा देखणा नवरा लग्नाचे फोटो काढत असतानाच तिच्या सुंदर मेहुणीसोबत पळून गेला. नुकतंच या महिलेने एका रेडिओ शोमध्ये आपली ही दुःखद कहाणी सांगितली. कायली असं या महिलेचं नाव असून, ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्नची आहे.

वाटत होतं तोच माझा नवरा, पण गेला निघून...

advertisement

नोव्हा रेडिओच्या 'लेट ड्राईव्ह विथ बेन, लियाम अँड बेल' या शोमध्ये कायलीने आपली धक्कादायक कहाणी ऐकवली. कायली म्हणाली की, लग्नानंतर अवघ्या काही तासांतच तिचा नवरा तिला सोडून तिच्या मेहुणीसोबत पळून गेला. कायलीने पुढे सांगितलं, "सहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमचं लग्न अगदी परिपूर्ण आहे असं सगळ्यांना वाटलं होतं. समारंभ खूप छान झाला, फोटोशूटमध्ये नवरा प्रेमाचा वर्षाव करत होता आणि पाहुणे सेलिब्रेशनसाठी तयार होते. पण फोटोसेशन संपताच नवरा गायब झाला." कायली म्हणाली, "आम्ही समारंभ केला, फोटो काढले. तोच माझं खरं प्रेम वाटत होता. पण तो फक्त निघून गेला. अनेक महिने त्याचा पत्ता नव्हता."

advertisement

नवरा गायब, नवरी खोलीत एकटीच, बाहेर रिसेप्शन सुरू...

कायलीने पुढे सांगितलं की, नवऱ्याशिवायच रिसेप्शन पार पडलं, पाहुण्यांना याची कोणतीही कल्पना नव्हती. कायलीने मोठ्या धैर्याने हसू चेहऱ्यावर ठेवलं, पण तिने आपला एकाकीपणा लपवला नाही. ती म्हणाली, "सगळ्यांनी रात्रभर पार्टी केली, पण मी माझ्या खोलीत एकटीच होती." नंतर समोर आलं की, नवरा तिच्या चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंधात होता आणि लग्नातही तो तिला फसवित होता. कायली म्हणाली, "त्याला माझ्यासोबत राहायचं नव्हतं, पण तरीही त्याने लग्न होऊ दिलं." नातेवाईक हनिमून आणि अभिनंदनासाठी फोन करू लागल्यावर हा विश्वासघात आणखी वेदनादायक ठरला. कायली म्हणाली, "कुटुंबातील सदस्यांशी बोलणं खूप कठीण होतं, जे दुसऱ्या दिवशी नवऱ्याबद्दल विचारत होते." सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा कायलीला कळलं की, नवरा तिच्याच चुलत बहिणीसोबत, म्हणजेच तिच्या मेहुणीसोबत आहे. ती म्हणाली, "तो आता माझ्या चुलत बहिणीसोबत आहे. मी त्याला भेटत नाही."

advertisement

लोक तिच्या धैर्याचं कौतुक करताहेत

या वेदनादायक अनुभवानंतरही कायली त्यातून सावरली. शोच्या होस्टने पुन्हा लग्न केलं का असं विचारल्यावर कायलीने लगेच "नाही!" असं उत्तर दिलं. तिच्या कथेने रेडिओ ऐकणाऱ्यांना आश्चर्यचकित केलं असून, सोशल मीडियावर लोक तिच्या धैर्याचं कौतुक करत आहेत. नोव्हाच्या सोशल पेजवर अनेक कमेंट्स आल्या, जिथे लोक या 'छोटेखानी' लग्नाच्या कथेवर आश्चर्य व्यक्त करत आहेत. कायलीच्या आयुष्यातील हा क्षण दुःखद असला तरी, तिच्या धैर्याने आणि हास्याने त्याला एक प्रेरणा बनवलं. सहा वर्षांचं नातं, एका दिवसाचं लग्न आणि चुलत बहिणीकडून मिळालेला विश्वासघात, ही कथा फिल्मी वाटते, पण कायलीने ती मागे टाकली आहे. तिची कहाणी अशा लोकांसाठी एक धडा आहे, जे प्रेमात फसले तरी हार मानत नाहीत.

advertisement

हे ही वाचा : रस्त्यावर मृत कावळा दिसला तर काय होतं? पूर्वज नाराज की, शनीची वक्रदृष्टी? त्यामागचे गूढ संकेत काय?

हे ही वाचा : 600 वर्षांपूर्वीचं, 3000 फांद्या, 4 एकराचा विस्तार, 'हे' महाकाय झाडं आहे कुठं? वाचा या अद्भुत झाडाची गोष्ट!

मराठी बातम्या/Viral/
सहा वर्षांचं प्रेम, एक दिवसाचं लग्न... नवरदेव फोटो सेशनमधूनच झाला गायब; मेहुणीनं टाकलं प्रेमाचं जाळं आणि...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल