लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायर होतो आहे. लग्नाची वरात 4 तास उशिरा पोहोचली. वरात उशिरा येण्याचं कारण काय हेसुद्धा या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. यामागील कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
बायकोला झोपवून बाल्कनीत आला नवरा, समोर होती शेजारीण; पुढे घडलं असं की...
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नाची वरात रस्त्यावरून जात आहे. सहसा लग्नाची मिरवणूक वाजतगाजत कार्यक्रमस्थळी म्हणजे लग्नमंडप किंवा लग्नाच्या हॉलवर जाते. मात्र या व्हिडिओमध्ये लग्नाची वरात मुलींच्या हॉस्टेलजवळ थांबलेली दिसते. वरात निघाली असता वाटेत मुलींचं वसतिगृह दिसलं. वसतिगृहाच्या गच्चीवर उभ्या असलेल्या मुली लग्नातील पाहुण्यांसोबत नाचू लागल्या. यानंतर लग्नाचे पाहुणे चार तास तिथं उभे राहिल्याने त्यांना लग्नाला जाण्यास उशीर झाला.
advertisement
reena.pal.1656 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर होताच तो व्हायरल झाला.
कपलचे असे फोटो, कुणाची हटत नाहीये नजर; शेवटचा PHOTO पाहून तर धक्काच बसेल
लोकांनी वधूबद्दल सहानुभूती व्यक्त केली. लग्नातील पाहुणे अनेकदा अशा गोष्टी करतात, त्यांच्या आनंदात ते वधूपक्ष आणि त्यांना किती त्रास सहन करावा लागतो याचा विचार करत नाहीत. असं अनेकांनी लिहिलं आहे. तर काहींनी लिहिलं की, मुली लग्नापूर्वीच इतकी मजा करू शकतात. लग्नानंतर आयुष्य जबाबदाऱ्यांचं ओझ्याखाली दबतं.