TRENDING:

Video : रिव्हर राफ्टिंगदरम्यान पर्यटक बुडाला, वाचवायला गंगेत चक्क 'देवदूत' अवतरला

Last Updated:

River Rafting Accident Video : रिव्हर राफ्टिंग एक रोमांचक, साहसी पण खतरनाक असा खेळ. याचा एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : कित्येक लोक आहेत ज्यांना साहसी खेळ आवडतात. जो पाहताना कित्येकांना धडकी भरते. असाच एक साहसी खेळ म्हणजे रिव्हर राफ्टिंग ज्याला व्हाइट राफ्टिंग असंही म्हटलं जातं. दुधडी भरून वाहणाऱ्या नदीच्या पांढऱ्याशुभ्र लाटांवर बोटीतून तरंगत जाण्याचा हा खेळ. हा खेळ जीवघेणाही ठरू शकतो. रिव्हर राफ्टिंगचा असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. रिव्हर राफ्टिंग करताना एक पर्यटक नदीत बुडाल्याचा हा व्हिडीओ. गंगा नदीत हा पर्यटक बुडाला आणि त्याला वाचवायला चक्क देवदूत अवतरला.
News18
News18
advertisement

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये घडलेली ही घटना. रिव्हर राफ्टिंग करणारा पर्यटक गंगा नदीत बुडाला. व्हिडीओ तुम्ही पाहू शकता रिव्हर राफ्टिंगची बोट दिसते आहे, ज्यात काही पर्यटक बसले आहेत आणि बोटीपासून दूर कुणीतरी बुडत असल्याचं दिसतं आहे. बोटीवरील एक व्यक्ती एक लांब दोरी बोटीला बांधते आणि बुडणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने फेकते. त्या दोरीच्या मदतीने ती व्यक्ती कशीबशी बोटीपर्यंत पोहोचते.

advertisement

तुम्ही व्हिडीओ पाहाल तर बुडणारी व्यक्ती एकटी नाही तर तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे जिनं तिला वाचवलं आहे. रिव्हर राफ्टिंग दरम्यान गंगा नदीत बुडालेल्या या व्यक्तीला वाचवणारी ही व्यक्ती गाइड असल्याचं सांगितलं जातं आहे. जिनं व्यक्तीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला.

advertisement

Weird Food : आता हेच बाकी होतं! ब्रा-चड्डी पकोडा, खायला महिला-पुरुषांच्या रांगा, कुठे बनते ही विचित्र डिश? Watch Video

रिव्हर राफ्टिंग करताना काय काळजी घ्यावी?

वेगाने वाहणाऱ्या नद्यांच्या लाटा ओलांडत पुढे जाणे एक रोमांचक अनुभव देते. पण हा अनुभव जितका साहसाने भरलेला आहे तितकाच तो धोकादायक देखील असू शकतो. दरवर्षी अनेक अपघात घडतात कारण लोक सुरक्षिततेचे नियम हलक्यात घेतात म्हणूनच, राफ्टिंगला जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स जाणून घेणं आणि समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. लोकल 18शी बोलताना, राफ्टिंग गाईड नवीन यांनी याआधी याबाबत माहिती दिली होती.

advertisement

परवानाधारक आणि अनुभवी गाईड

राफ्टिंग करताना सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवानाधारक आणि अनुभवी गाईड असणं. स्थानिक एजंट किंवा अज्ञात संस्थेशी संपर्क न साधता राफ्टिंग करणं धोकादायक ठरू शकतं. तुमच्या गाईडला नदीची माहिती आहे आणि त्याच्याकडे आवश्यक प्रशिक्षण आणि बचाव कौशल्ये आहेत याची नेहमी खात्री करा. याशिवाय, राफ्टिंग करण्यापूर्वी दिलेल्या सुरक्षा सूचना काळजीपूर्वक ऐकणं आणि त्यांचं पालन करणं देखील बंधनकारक आहे.

सुरक्षेसाठी सेफ्टी गियर महत्त्वाचं

तुमच्या सुरक्षेसाठी सेफ्टी गियर म्हणजेच लाईफ जॅकेट आणि हेल्मेट हे सर्वात महत्त्वाचे साथीदार आहेत. हे योग्यरित्या घालावेत. निकृष्ट दर्जाचे किंवा सैल गियर तुम्हाला धोक्यात आणू शकतात.

खाण्यापिण्याचेही पथ्य पाळा

याशिवाय, राफ्टिंग करण्यापूर्वी जड अन्न खाऊ नका किंवा मद्यधुंद अवस्थेत करू नका. यामुळे तुमचं संतुलन बिघडू शकतं आणि तुम्ही संघाला मदत करू शकणार नाही.

एकमेकांना मदत करा

राफ्टिंग ही एक ग्रुप अॅक्टिव्हिटी आहे आणि त्यात टीमवर्क सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. सर्व साथीदारांनी समन्वय राखला पाहिजे आणि एकमेकांना मदत केली पाहिजे. जेव्हा तुम्ही वेगवान किंवा वेगाने वाहणाऱ्या क्षेत्रात पोहोचता तेव्हा घाबरण्याऐवजी तुम्ही शांत राहावं आणि मार्गदर्शक काय म्हणतो तिथं पूर्ण लक्ष द्यावं.

चुकून बुडालात तर काय करायचं?

जर तुम्ही चुकून पाण्यात पडलात तर घाबरू नका. तुमचे पाय पुढे ठेवा, पाठीवर झोपा आणि तुमचं शरीर सैल सोडा जेणेकरून तुम्ही पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे जाऊ शकाल आणि दगडांमुळे तुम्हाला दुखापत होणार नाही.

मराठी बातम्या/Viral/
Video : रिव्हर राफ्टिंगदरम्यान पर्यटक बुडाला, वाचवायला गंगेत चक्क 'देवदूत' अवतरला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल