Weird Food : आता हेच बाकी होतं! ब्रा-चड्डी पकोडा, खायला महिला-पुरुषांच्या रांगा, कुठे बनते ही विचित्र डिश? Watch Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर चड्डी-ब्रा पकोडा विकला जात असल्याचं दिसत आहे.
नवी दिल्ली : आजवर तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी, मूगाची भजी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भजी खाल्ल्या असतील. पण कधी चड्डी-ब्रा पकोडा या विचित्र भजीबाबत ऐकलं तरी आहे का? वाचूनच तुम्हाला विचित्र वाटलं असेल. पण चड्डी-ब्रा पकोड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. चड्डी आणि ब्राच्या आकारात बनवलेली ही भजी किंवा विचित्र पदार्थ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा अनोखा पकोडा खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी आहे.
ब्रा आणि चड्डी महिलांचे अंडरगार्मेंट्स. महिला हे कपडे घालतात आणि कपड्यांपासून खाण्याचे पदार्थ कधी कुणी विचारही केला नसेल. पण ते केलं गेलं आहे आणि त्याचा व्हिडीओही व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात एक व्यक्ती कढईत तेल गरम करून त्यात कांदा आणि भजीसारखं पॅन्टी आणि ब्रा सारख्या आकाराचे पकोडे तळताना दिसत आहेत. दुकानदार ते पॅनमधून बाहेर काढतो आणि कागदावर ठेवतो आणि ग्राहकांना वाढतो.
advertisement
हा पदार्थ जो वाचायलाच अजब वाटतो आहे, तो पदार्थ कोण खाणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही हा पदार्थ खाण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. अगदी पुरुष आणि महिला दोघांनी या पदार्थाची चव चाखण्यासाठी रांगा लावल्या आहेत. व्हिडिओमध्ये हा विचित्र पदार्थ खाण्यासाठी बरेच लोक रांगेत उभे असलेले दिसत आहेत.
advertisement
Location :
Delhi
First Published :
June 12, 2025 1:05 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Weird Food : आता हेच बाकी होतं! ब्रा-चड्डी पकोडा, खायला महिला-पुरुषांच्या रांगा, कुठे बनते ही विचित्र डिश? Watch Video