काय! मानवी विष्ठेपासून औषध, शास्त्रज्ञांनी बनवली Poop Pills, पण कशासाठी?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Poop Pills : ब्रिटिश शास्त्रज्ञांनी चक्क मानवी विष्ठेपासून औषध बनवलं आहे. ही जादुई कॅप्सू मानली जाते. जी प्रत्येक आजार बरा करेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
नवी दिल्ली : आपण कधी ना कधी आजारी पडतो, त्यावर औषधं घेतो. जे सिरप, कॅप्सूल, टॅबलेट किंवा पावडरच्या रूपात असतात. सामान्यपणे औषधंही आयुर्वेदिक किंवा काही रसायनांपासून बनवलेली असतात. पण तुम्ही कधी पूप म्हणजे मानवी विष्ठेपासून औषध बनवल्याचं ऐकलं आहे का? वाचूनच तुम्हाला विचित्र वाटलं असेल पण शास्त्रज्ञांनी मानवी विष्ठेपासून एक गोळी म्हणजे पूप पिल्स तयार केली आहे.
जगभरातील शास्त्रज्ञ जगाचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या पैलूंवर सतत संशोधन करत असतात. पण कधीकधी ही प्रगती इतकी विचित्र असते की त्याबद्दल जाणून लोकांना धक्का बसतो. असंच हे विचित्र संशोधन. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी चक्क मानवी विष्ठेपासून औषध बनवलं आहे. ही जादुई कॅप्सू मानली जाते. जी प्रत्येक आजार बरा करेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
advertisement
पूप पिल्सचा प्रयोग
निरोगी व्यक्तीची विष्ठा भरलेली ही कॅप्सूल. ब्रिटनमधील संशोधक हे तपासत आहेत की या कॅप्सूलमध्ये भरलेल्या निरोगी दात्याच्या कोरड्या मलामुळे रुग्णांच्या आतड्यांमध्ये लपलेले अँटीबायोटिक-प्रतिरोधक बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात का. याचा अर्थ असा की दुसऱ्याची विष्ठा तुम्हाला सुपरबग्सपासून वाचवू शकते.
advertisement
या अभ्यासात नुकतंच औषध-प्रतिरोधक संसर्गातून बरे झालेल्या 41 रुग्णांचा समावेश होता. त्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आलं. पहिल्या गटाला तीन दिवस या पूप पिल्सचे तीन डोस देण्यात आले, तर दुसऱ्या गटाला प्लेसिबो (बनावट औषध) देण्यात आलं. एका महिन्यानंतर चाचणी केली असता असं आढळून आलं की ज्या रुग्णांना पूप पिल्स देण्यात आले त्यांच्या आतड्यांमध्ये निरोगी दात्याच्या जीवाणूंचा समावेश होता, जे दर्शवतं की वाईट बॅक्टेरिया बाहेर काढण्यात आले आहेत.
advertisement
लंडनमधील गायज आणि सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये या अभ्यासाचे नेतृत्व करणारे डॉ. ब्लेअर मेरिक यांनी बीबीसीला सांगितलं, "हे खूप उत्साहवर्धक आहे. वीस वर्षांपूर्वी आम्हाला वाटायचं की सर्व बॅक्टेरिया आणि विषाणू हानिकारक आहेत, पण आता आम्हाला समजलं आहे की ते आपल्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत."
advertisement
पूप पिल्स कुठे कामी येईल?
कॅन्सर आणि यकृताचे आजार यासारख्या गंभीर जीवघेण्या आजारांच्या उपचारांमध्ये आशादायक परिणाम दर्शवत आहेत. काही शास्त्रज्ञ असंही म्हणत आहेत की निरोगी व्यक्तीच्या विष्ठेचं प्रत्यारोपण ज्याला फेकल ट्रान्सप्लांट म्हणतात हे केवळ शरीरातील आजारांशी लढू शकत नाही, तर जिममध्ये चांगलं प्रदर्शन करण्यास आणि वयाचे परिणाम कमी करण्यास देखील मदत करू शकते.
advertisement
पूप पिल्सबाबत शास्त्रज्ञ काय सांगतात?
सुपरबग्स म्हणजेच असे जंतू जे अँटीबायोटिक्सचा कोणताही परिणाम होऊ देत नाहीत 2050 पर्यंत जगभरात सुमारे 3.9 कोटी मृत्यूंना कारणीभूत ठरू शकतात. मायक्रोबायोम संशोधन शास्त्रज्ञ क्रिसी सेर्गाकी यांनी बीबीसीला सांगितलं की जर भविष्यातील चाचण्यांमध्ये पूप पिल्स प्रभावी ठरल्या तर मल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट (एफएमटी) भविष्यातील नवीन औषध बनू शकतं. आपण भविष्यात अँटीबायोटिक्सना मायक्रोबायोम-आधारित थेरपीने बदलू शकतो. ही आमची मोठी कल्पना आहे आणि त्यात खूप क्षमता आहे.
Location :
Delhi
First Published :
June 12, 2025 12:24 PM IST