भास्कर, जो एक जिम ट्रेनर आहे. होसूरमध्ये तो 4 जीम चालवतो. त्याची पत्नी जिचं नाव शशिकला, 2018 मध्ये त्यांचं लग्न झालं. तेव्हा शशिकला बंगळुरूमध्ये एक प्ले स्कूल चालवत होती. पण नंतर तीसुद्धा महिलांसाठी एक जीम चालवत होती.
30 एप्रिल रोजी शशिकलाचं अचानक निधन झालं. या प्रकरणी संशयास्पद परिस्थितीत भास्करला अटक करण्यात आली आहे. भास्करने दावा केला की बॉन्डेज सेक्सदरम्यान मृत्यू झाला आहे. पोलीस चौकशीदरम्यान भास्करनं सांगितलं की, तो आणि शशिकला दारू प्यायले होते. त्यानंतर त्यांनी संमतीने बॉन्डेज सेक्स करायचं ठरवलं. भास्करने शशिकलाचे हात आणि पाय बांधले आणि गळ्यात कापड बांधलं. यादरम्यान शशिकलाच्या नाकातून रक्त येऊ लागलं आणि ती बेशुद्ध पडली. यानंतर तो तिला रुग्णालयात घेऊन गेला, जिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
advertisement
उत्साहात वरात घेऊन आला नवरदेव, नवरीला पाहिलं अन् रडू लागला, म्हणाला, 7 फेरे घेईन पण...
दरम्यान शशिकलाचे वडील अरुल आणि इतर नातेवाईकांनी भास्करने शशिकलाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. अरुल म्हणाला, "भास्करने तिचं तोंड दाबलं, तिचे हातपाय बांधले आणि तिला मारलं. मग त्याने मला फोन करून सांगितलं की तुमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
कुटुंबाचं म्हणणं आहे की शशिकलाला भास्करचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता, ज्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणं होत असत. अरुलचा आरोप आहे की भास्करने लग्नाच्या वेळी 14 लाख रुपये हुंडा म्हणून घेतले होते आणि नंतरही तो त्याच्या मुलीला वाईट वागणूक देत राहिला. अनेकदा त्याच्या मुलीला मारहाण करायचा. त्याच्या मुलीला दोनदा रुग्णालयात दाखल करावं लागलं. घरगुती हिंसाचाराचा बळी असल्याने त्याने यापूर्वी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
महिलेने चक्क अर्धा बेड भाड्याने दिला, कोणीही या तिच्या शेजारी झोपा, पण एक अट
या जोडप्याला 2 आणि 4 वर्षांची अशी दोन लहान मुलं आहेत. आईच्या मृत्यूनंतर आणि वडिलांना अटक झाल्यानंतर, मुलांची जबाबदारी आता त्यांच्या आजी-आजोबांवर आहे.
काय आहे बॉन्डेज रिलेशन?
बॉन्डेज प्ले किंवा बीडीएसएम ही लैंगिक संबंधांची एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एका जोडीदाराला बांधलं जातं आणि दुसरा जोडीदार त्याच्यासोबत जे काही करायचे ते करू शकतो. ही अशी शैली आहे जी कामुकता आणि उत्साहाला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाते.
यामध्ये थप्पड मारणं, चाबूक वापरणं, दोन्ही जोडीदारांना लैंगिक आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी वापरणं जसं की मध चॉकलेट आणि फळं इत्यादींचा समावेश आहे. जोडीदाराला बांधण्यासाठी कफ, दोरी किंवा बॉन्डेज टेपचा वापर केला जातो.
परदेशात बीडीएसएम खूप सामान्य आहे, परंतु भारतात त्यासाठी फार कमी दरवाजे उघडे आहेत.