महिलेने चक्क अर्धा बेड भाड्याने दिला, कोणीही या तिच्या शेजारी झोपा, पण एक अट

Last Updated:

Woman rent half bed : महिलेने तिच्या बेडचा अर्धा भाग भाड्याने दिला. यासाठी तिने ऑनलाइन पोस्ट केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अनेक लोकांनी बेड भाड्याने घेण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला.

News18
News18
नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही घर, दुकान, गाडी अशा गोष्टी भाड्याने दिलेलं पाहिलं आहे. घराचं म्हणाल तर काही लोक घरातील फक्त एक खोली भाड्याने देऊन पेंईंग गेस्ट ठेवतात. पण एका तरुणीने  तर चक्क आपला बेड  भाड्याने दिला आहे. तोसुद्धा अर्धा बेड.
दरवर्षी भारतातील अनेक लोक परदेशात स्थायिक होतात. काही अमेरिकेत जातात तर काही युरोपला. पंजाब आणि हरियाणामधील बहुतेक लोक कॅनडाला जातात. पण गेल्या काही काळापासून कॅनडामध्ये राहणे लोकांसाठी खूप महाग झाले आहे. कॅनडामध्ये राहणीमानापासून ते अन्नपदार्थांपर्यंत सर्व काही खूप महाग होत आहे. यामुळे, लोकांना आता कॅनडामध्ये टिकून राहण्यासाठी पैसे कमवण्याचे आणि वाचवण्याचे विविध मार्ग शोधावे लागत आहेत. जेव्हा एका कॅनेडियन महिलेने सोशल मीडियावर लोकांसोबत पैसे कमवण्याचा तिचा अनोखा मार्ग शेअर केला तेव्हा मोठा गोंधळ उडाला.
advertisement
37 वर्षीय मोनिक जेरेमियाने लोकांसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा एक मार्ग शेअर केला. तिने सांगितलं की कॅनडामध्ये लॉकडाऊन दरम्यान तिला पैशांची तीव्र टंचाई भासत होती. तसंच, त्याच काळात तिचं ब्रेकअप झालं. अशा परिस्थितीत तिने पैसे कमवण्याचा एक नवीन मार्ग शोधला. त्या महिलेने तिच्या बेडचा अर्धा भाग भाड्याने दिला. यासाठी तिने ऑनलाइन पोस्ट केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अनेक लोकांनी बेड भाड्याने घेण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला. त्या महिलेने तिच्या बेडचा अर्धा भाग भाड्याने देऊन चांगले पैसे कमवले.
advertisement
महिन्याला पन्नास हजार जास्त कमाई 
महिलेने सांगितलं की लॉकडाऊन दरम्यान तिचे उत्पन्नाचे सर्व स्रोत अचानक बंद झाले. अशा परिस्थितीत तिला कॅनडाची महागडी जीवनशैली परवडणारी नव्हती. त्या काळात तिचं ब्रेकअप झालं. ती तिच्या घरात एकटीच राहत होती. कॅनडामध्ये घराचं भाडंही खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, महिलेने तिच्या बेडचा अर्धा भाग खूपच कमी किमतीत भाड्याने देण्यास सुरुवात केली. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्या महिलेचा बेड भाड्याने देण्यासाठी अनेक लोक पुढे आले. अशाप्रकारे, त्या महिलेने अनोळखी लोकांसोबत बेड शेअर करून महिन्याला पन्नास हजार रुपये अतिरिक्त कमाई करण्यास सुरुवात केली.
advertisement
काही नियम बनवले
या प्रणालीला हॉट बेडिंग म्हणून ओळखलं जातं. या प्रणालीमध्ये, अर्धे बेड अज्ञात लोकांना भाड्याने दिले जातात. यासाठी काही नियम देखील आहेत. एकमेकांच्या संमतीने मिठी मारता येते. पण दुसरी व्यक्ती ते जबरदस्तीने करू शकत नाही. जेव्हा त्या महिलेने लोकांसोबत पैसे कमवण्याचा तिचा मार्ग शेअर केला तेव्हा अनेकांनी तिची खिल्ली उडवली आणि याला धोकादायक म्हटलं. जर एखादा गुन्हेगार तुमच्या शेजारी झोपला तर मोठा अपघात होऊ शकतो. या पोस्टनंतर, हॉट बेडिंगची संकल्पना बरीच लोकप्रिय झाली. या पद्धतीने पैसे कमवण्याच्या अनेक महिलांनी कथा सांगितल्या.
मराठी बातम्या/Viral/
महिलेने चक्क अर्धा बेड भाड्याने दिला, कोणीही या तिच्या शेजारी झोपा, पण एक अट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement