हॉटेल रूममध्ये एकटी तरुणी, बेडखालून विचित्र आवाज, वाकून पाहिलं तर पुरती हादरली

Last Updated:

Hotel room story : एक सोलो प्रवासी तरुणी, जिने अलीकडेच जपानला भेट दिली. तिच्यासोबत एक घटना घडली ज्यामुळे ती खूप घाबरली.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : बऱ्याचदा मुली एकट्याने प्रवास करतात, एकट्या अज्ञात ठिकाणी जातात आणि हॉटेलमध्ये राहतात. यात काहीही नुकसान नाही, उलट स्वतंत्र राहण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. पण मुलींनी प्रवासादरम्यान खूप सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कारण मुलींना एकटे पाहून वाईट लोक सक्रिय होतात आणि त्यांचा पाठलाग करू लागतात किंवा त्यांना त्रास देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधू लागतात. जपानमधील एका हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबतही असेच काहीसे घडलं. तिच्या पलंगाखाली तिला विचित्र आवाज येऊ लागला. तिनं खाली वाकून पाहिल्यानंतर ती हादरली.
इन्स्टाग्राम युझर नतालिसी (@natalisi_taksisi) ही थायलंडची सोलो ट्रॅव्हलर आहे जिने अलीकडेच जपानला भेट दिली. तिच्यासोबत एक घटना घडली ज्यामुळे ती खूप घाबरली. तिने एक व्हिडिओ बनवला आणि घटनेबद्दल सांगितलं. तिने सांगितले की ती 3 दिवसांसाठी एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेली होती. हॉटेलच्या बेडखालून एक विचित्र आवाज येत असताना तिने एक नजर टाकली. जेव्हा तिला खाली दोन डोळे दिसले तेव्हा ती खूप घाबरली आणि ओरडू लागली.
advertisement
तिच्या बेडखाली एक अज्ञात व्यक्ती होती. काही क्षण तो नतालीकडे पाहू लागला. त्यानंतर तोही ओरडू लागला आणि तिथून पळून गेला.
ताबडतोब पोलिसांना बोलावण्यात आलं. ती व्यक्ती कोण होती आणि ती तिथं कशी आली याचं उत्तर हॉटेल कर्मचाऱ्यांकडे नव्हतं. सीसीटीव्ही कॅमेरेही खराब होते. हॉटेलमध्ये कार्ड सिस्टीम होती, त्यामुळे कार्डशिवाय ती व्यक्ती खोलीत कशी आली याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.
advertisement














View this post on Instagram
























A post shared by Natali (@natalisi_taksisi)



advertisement
खूप प्रयत्नांनंतर, महिलेला हॉटेलकडून पूर्ण पैसे परत मिळाले आणि ती दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट झाली, परंतु तिची भीती तशीच राहिली.
अनेक लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की अशा हॉटेल्सवर बंदी घालावी, तर दुसऱ्याने म्हटलं की ही कहाणी ऐकल्यानंतर तो घाबरला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
हॉटेल रूममध्ये एकटी तरुणी, बेडखालून विचित्र आवाज, वाकून पाहिलं तर पुरती हादरली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement