वरोडा येथील रोशन भजनकर या तरुणाशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा त्याने सांगितले की, बॉडी बिल्डिंग हे काही माझं स्वप्न नव्हतं. माझे दादा जेव्हा जिममध्ये जात होते. तेव्हा मी त्यांच्यासोबत जात होतो. तेव्हा वाटायचं की, आपण 18 वर्षाच्या वर झालो की, आपण पण असच जिमला जाऊ. त्यानंतर काही दिवसांनी मी जिम सुरू केले. त्यानंतर मी बडनेरा रेल्वे स्टेशनला हमाली काम सुरू केले. गेले 15 वर्षापासून मी हमाली काम करत आहे. हमाली काम आणि बॉडी बिल्डिंग हे दोन्ही मी सोबतच करत आहे.
advertisement
नोकरी मिळाली नाही, तरीही सोडली नाही जिद्द! सुबोध सुरू केला 'हा' छोटा व्यवसाय; आता कमवतोय बक्कळ पैसा
बॉडी बिल्डिंग कडे कल कसा वाढला?
दादा सोबत जिमला जायला सुरुवात केली. तेव्हा त्याठिकाणी माझे अनेक मित्र मंडळी तयार झाली. त्यांच्या सपोर्टमुळे मी बॉडी बनवण्याच्या नादी लागलो. थोड्या दिवसांत माझी बॉडी थोडी व्यवस्थित झाल्यानंतर माझ्या मित्रांनी मला एका स्पर्धेत सहभागी होण्यास भाग पाडले. त्या स्पर्धेत मी टिकू शकलो नाही. त्यामुळे मी खूप निराश झालो होतो. असं वाटत होतं आपण यात खूप मागे आहोत. पुढे जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. तेव्हा लक्षात आले होते की, स्पर्धेत येण्यासाठी मला काय काय करायला हवं.
तेव्हापासून मी मग 1 महिना फक्त सॅलड घेत होतो आणि वर्क आऊट करत होतो. त्यानंतर पुन्हा बडनेरा येथे स्पर्धा होती. त्याठिकाणी मी पहिला आलो. तेव्हा माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यासोबतच कळले की, उपाशी राहून बॉडी बनत नसते. माझे कोच सुद्धा मला त्याठिकाणी मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी माझे डाएट प्लॅन, वर्कआऊट करत आहे. तेव्हापासून माझ्यात खूप बदल झालेत. मला पुढेही यात करिअर करायचं आहे. तेव्हापासून म्हणजेच 2017 पासून ते 2025 पर्यंत मी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. माझे काम आणि वर्कआऊट दोन्ही मी सांभाळत आहे.
दिनचर्या कशी असते?
मी सकाळी 4 वाजता उठून कामाला जातो. कारण उन्हाळ्यात आम्हाला काम जास्त असते. तेव्हापासून मी माझा नाश्ता सोबत ठेवतो. ओट्स, अंडी असा सकाळचा नाश्ता मी घेतो. त्यानंतर दुपारच्या जेवणात चिकन, राईस, सॅलड असा आहार असतो. सायंकाळच्या वेळी काही वेळा केळी तर काही वेळा ओट्स, अंडी असा सायंकाळचा नाश्ता असतो. त्यानंतर जिम ला जाऊन वर्क आऊट करतो. घरी आल्यानंतर पुन्हा जेवण घेऊन असा डाएट प्लॅन मी फॉलो करतो. कामाच्या गडबडीत सुद्धा मी तो चुकू देत नाही. यात खूप संघर्ष आहे. माझी फॅमिली आणि मित्र परिवार माझ्या पाठीशी आहे. म्हणून मी हे सर्व करू शकतो, असे रोशन सांगतात.