असं मानलं जातं की भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर हनुमान देवाची पूजा करण्यासाठी हिमालयात गेले होते. तिथं जाऊन त्यांनी आपल्या नखांनी पर्वताच्या खडकांवर रामायण रचलं. ज्यामध्ये त्यांनी भगवान श्री रामाची कहाणी सांगितली.
काही काळानंतर जेव्हा महर्षी वाल्मिकी हनुमानला त्यांनी रचलेलं रामायण दाखवण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी हनुमानने रचलेले रामायण देखील पाहिलं. हे पाहून वाल्मिकी थोडे निराश झाले. जेव्हा हनुमानाने त्यांना त्यांच्या निराशेचं कारण विचारलं तेव्हा महर्षींनी उत्तर दिलं की त्यांनी खूप मेहनत घेऊन रचलेलं रामायण हनुमानाच्या रचनेच्या तुलनेत काहीच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची रचना दुर्लक्षित राहिल. हे ऐकून हनुमानाने रामायण रचलेला पर्वतशिला एका खांद्यावर उचलला आणि दुसऱ्या खांद्यावर वाल्मिकी ऋषींना बसवले आणि समुद्रात जाऊन आपली निर्मिती रामाला समर्पित केली, समुद्रात विसर्जित केली.
advertisement
Ramayan : रामभक्त हनुमान, पण त्यांनी प्रभू रामाला मदत करायला दिला होता नकार
तेव्हापासून हनुमानानं रचलेलं हनुमद रामायण उपलब्ध नाही. त्यानंतर महर्षी वाल्मिकी म्हणाले की, हनुमान तुम्ही धन्य आहात, तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही.
तुलसीदासांना हनुमान रामायणातील एक दगड सापडला
महर्षी वाल्मिकींनी म्हटलं होतं की ते हनुमानाचा महिमा गाण्यासाठी दुसरा जन्म घेतील. त्यांनी त्यांच्या रचनेच्या शेवटीदेखील हे म्हटलं आहे. असं मानलं जातं की रामचरितमानसचे लेखक कवी तुलसीदास हे महर्षी वाल्मिकींचे दुसरे अवतार होते.
Ramayan : रामायणातील एक प्रेमकथा! म्हणतात रावणाची मुलगी हनुमानाच्या प्रेमात पडली होती
महान कवी तुलसीदासांच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर एक दगड सापडला होता जो सार्वजनिक ठिकाणी टांगलेला होता. जेणेकरून विद्यार्थी ते संकेतचिन्ह वाचू शकतील आणि त्याचा अर्थ शोधू शकतील. असं मानलं जातं की तुलसीदासांनी त्याचा अर्थ उलगडला होता आणि त्यांना हे देखील कळलं की ही पाटी हनुमानाने रचलेल्या हनुमद रामायणाचा एक भाग आहे. जे पाण्यासोबत डोंगराच्या खडकातून वाहत इथं आलं आहे. ते मिळाल्यानंतर, तुलसीदास स्वतःला खूप भाग्यवान समजत होते की त्यांना हनुमान रामायणाचा एक श्लोक मिळाला.
