Ramayan : रामायणातील एक प्रेमकथा! म्हणतात रावणाची मुलगी हनुमानाच्या प्रेमात पडली होती
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ramayan Story : वाल्मिकी रामायणाव्यतिरिक्त जगभरात इतर अनेक रामायण लिहिली गेली आहेत. अशाच दोन रामायणांमध्ये लंकेचा राजा रावणाच्या एका कन्येचा उल्लेख आहे. जी हनुमानाच्या प्रेमात पडली असं म्हणतात.
मुंबई : श्री राम, रामभक्त हनुमान आणि रावणाच्या वधाशी संबंधित अनेक कथा केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही ऐकायला मिळतात. वाल्मिकी रामायणाव्यतिरिक्त अनेक देशांमध्ये वेगवेगळे रामायण लिहिले गेले आहेत. दोन रामायणांमध्ये रावणाच्या कन्येबद्दल लिहिलं आहे. एवढंच नाही तर रावणाची मुलगी हनुमानावर प्रेम करत होती असाही उल्लेख आहे.
वाल्मिकी रामायणानंतर केवळ दक्षिण भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये रामायण त्यांच्या पद्धतीने लिहिलं गेलं आहे. यातील बहुतेक रामायणांमध्ये श्रीरामांसोबत रावणालाही खूप महत्त्व देण्यात आलं आहे. म्हणूनच श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, माली, थायलंड आणि कंबोडियामध्येही रावणाला पूर्ण महत्त्व दिलं जाते. वाल्मिकी रामायणात किंवा तुलसीदासजींनी लिहिलेल्या रामचरित मानसात रावणाच्या मुलीचा उल्लेख नाही. पण थायलंडच्या रामकिन रामायणात आणि कंबोडियाच्या रामकर रामायणातही रावणाच्या मुलीचा उल्लेख आहे.
advertisement
रामकीण रामायण आणि रामकेर रामायण काय सांगतं?
रामकीण आणि रामकर रामायणानुसार, रावणाला त्याच्या तीन पत्नींपासून सात मुलं होती. त्याची पहिली पत्नी मंदोदरीपासून त्याला मेघनाद आणि अक्षय कुमार ही दोन मुलं झाली. त्याच वेळी, त्याला त्याची दुसरी पत्नी धन्यमालिनीपासून अतिकाय आणि त्रिशिरा नावाची दोन मुलं झाली. त्याच्या तिसऱ्या पत्नीपासून त्याला प्रहस्थ, नरांतक आणि देवांतक ही तीन मुलं झाली.
advertisement
दोन्ही रामायणांमध्ये असं सांगितलं आहे की सात पुत्रांव्यतिरिक्त रावणाला एक मुलगी देखील होती. तिचं नाव सुवर्णमाचा किंवा सुवर्णमत्स्या होतं. असं म्हटलं जातं की ती दिसायला खूप सुंदर होती. तिचं शरीर सोन्यासारखं चमकत होते. तिला गोल्डन मरमेड असंही म्हणतात. त्याचा शाब्दिक अर्थ सोन्याचा मासा असा आहे.
advertisement
चीनमध्ये ड्रॅगनची पूजा केली जाते त्याचप्रमाणे थायलंड आणि कंबोडियामध्ये गोल्डफिशची पूजा केली जाते. थायलंडमध्ये काही ठिकाणी तिचं वर्णन ऐतिहासिक थाई पात्र तोसाकांतची मुलगी म्हणून देखील केलं जातं.
गोल्डन फिश आणि नाला-नील यांचा संबंध
वाल्मिकी रामायणाच्या थाई आणि कंबोडियन आवृत्तींनुसार, लंका जिंकताना भगवान रामाने नल आणि नील यांना समुद्र ओलांडण्यासाठी पूल बांधण्याचं काम सोपवलं. जेव्हा नल आणि नील भगवान रामाच्या आज्ञेनुसार समुद्रावर लंकेला जाण्यासाठी पूल बांधत होते, तेव्हा रावणाने ही योजना उधळून लावण्याचं काम त्याची मुलगी सुवर्णमत्स्या हिला सोपवलं होतं. वडिलांची परवानगी मिळाल्यानंतर सुवर्णमाच्छाने वानर सैन्याने समुद्रात फेकलेले दगड गायब करण्यास सुरुवात केली. या कामासाठी तिने समुद्रात राहणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांची मदत घेतली.
advertisement
सुवर्णमाच्छा हनुमानाच्या प्रेमात पडली?
रामकीन आणि रामकेर रामायणात असं लिहिलं आहे की जेव्हा वानर सैन्याने फेकलेले दगड गायब होऊ लागले, तेव्हा हनुमान समुद्रात उतरला आणि हे दगड कुठे जात आहेत ते पाहिलं? त्याने पाहिलं की पाण्याखाली राहणारे लोक दगड उचलून कुठेतरी घेऊन जात होते. जेव्हा तो त्यांच्या मागे गेला तेव्हा त्याला एक मत्स्य कन्या त्यांना हे काम करायला भाग पडत असल्याचं दिसलं. कथेत असं म्हटलं आहे की सुवर्णमाच्छा हनुमानाला पाहताच त्याच्या प्रेमात पडली.
advertisement
हनुमान तिच्या मनाची स्थिती समजून घेतात आणि तिला समुद्रतळावर घेऊन जातात आणि विचारतात की तू कोण आहेस देवी? ती म्हणते की मी रावणाची मुलगी आहे. मग हनुमान तिला समजावून सांगतो की रावण काय चुकीचं काम करत आहे. त्यानंतर सुवर्णमाच्छ सर्व खडक परत करते आणि रामसेतूचं बांधकाम पूर्ण होतं.
advertisement
(सूचना : हा लेख धार्मिक, ऐतिहासिक ग्रंथांवर आधारित आहे. जो फक्त माहितासाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठीने याची खातरजमा केली नाही. कुणाच्याही भावना दुखावण्याचाही न्यूज18मराठीचा उद्देश नाही.)
view commentsLocation :
Delhi
First Published :
April 12, 2025 6:01 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Ramayan : रामायणातील एक प्रेमकथा! म्हणतात रावणाची मुलगी हनुमानाच्या प्रेमात पडली होती


