TRENDING:

Tea Lover : तुम्ही कधी फिश चहा प्यायलाय का? Video पाहूनच येईल किळस

Last Updated:

जगभरात अनेक चहाप्रेमी आहेत. अनेकांचा दिवसच चहापासून सुरु होतो आणि चहापासूनच संपतो. काहींना तर एकप्रकारे चहाची नशाच असते जो घेतल्याशिवाय त्यांना होत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : जगभरात अनेक चहाप्रेमी आहेत. अनेकांचा दिवसच चहापासून सुरु होतो आणि चहापासूनच संपतो. काहींना तर एकप्रकारे चहाची नशाच असते जो घेतल्याशिवाय त्यांना होत नाही. चहामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार चहाचं सेवन करतो. आजकाल तर चहामध्ये अनेक वेगवेगळे पदार्थही टाकले जातात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये चहामध्ये चक्क मासा घातला आहे. चहामध्ये मासा हे ऐकूनच किळसवाणं वाटत आहे. याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ उडवत आहे.
तुम्ही कधी फिश चहा प्यायलाय का?
तुम्ही कधी फिश चहा प्यायलाय का?
advertisement

तुम्ही कधी फिश चहा विषयी ऐकलंय का? किंवा प्यायलाय का? सध्या इंटरनेटवर या चहाची जोरदार चर्चा रंगली आहे. फिश चहाचा व्हिडीओ व्हायरल होत असून लोक यावर अनेक विचित्र प्रतिक्रिया देत आहेत.

'मला साबण आवडतो' म्हणत मुलीने साबणच खाल्ला, Video पाहून लावाल डोक्याला हात

फिश चहाच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला आधी पाणी, दूध आणि पाने मिसळून चहा बनवते. चहा उकळल्यानंतर महिला माशाचा तुकडा उकळत्या चहामध्ये टाकते. काही वेळात माशाचा तुकडा बाहेर काढते, चहा गाळते आणि ग्लासमध्ये ओतते. यानंतर, ती माशाचा शिजवलेला तुकडा एका काठीला जोडते आणि कपवर ठेवते. आणि असा तयार झाला फिश टी.

advertisement

@price_trader_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा फिश टी चा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 38 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून तु्म्हीही चाट पडाल की, असा पण चहा असतो. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असून अनेकांनी याविषयी संताप व्यक्त केला तर काहींनी त्याला किळसवाणं म्हटलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, आजकाल खाद्यपदार्थांमध्ये काहीही मिक्स करण्याचा नवा ट्रेंडच आला आहे. अनेक फूड फ्युजनचे विचित्र व्हिडीओ समोर येत असतात. काही तर इतके विचित्र असतात ज्याचा खायचा किंवा प्यायचाही आपण विचार करु शकत नाही. विक्रेते अशा खाद्यपदार्थांची हटके जाहिरात करुन ग्राहकांचं लक्ष वेधतात.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Tea Lover : तुम्ही कधी फिश चहा प्यायलाय का? Video पाहूनच येईल किळस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल