निधी नावाच्या विद्यार्थिनीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो काही वेळातच तुफान व्हायरल झाला. नवीन वर्ष सुरू झालं म्हणून गर्ल्स हॉस्टेलमध्ये पार्टी होत होती. विद्यार्थिनी रूममध्ये जोरदार पार्टी करत होत्या. त्यांनी पार्टीत वॉर्डनलाही सामील करून घेतलं.
advertisement
शरीराच्या फक्त त्या पार्टवर लक्ष ठेण्यासाठी महिलेने ठेवला ट्रेनर, महिन्याला 3 लाख पगार
नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करताना मुली एका प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यावर डान्स करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात अचानक त्यांची वॉर्डन खोलीत आली. वॉर्डनला पाहताच काही वेळ वातावरणात शांतता पसरली होती, कारण आता पार्टी थांबेल अशी आशा सर्वांना वाटत होती. पण घडलं वेगळंच.
विद्यार्थिनींचा उत्साह आणि आनंदाने वॉर्डनचे मन जिंकलं. पार्टी थांबवण्याऐवजी वॉर्डननं स्वतः डान्स फ्लोअरवर पाऊल ठेवलं आणि मुलींसोबत डान्स केला. व्हिडिओमध्ये वॉर्डन मुलींसोबत हसताना आणि नाचताना दिसत आहे. हा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला.
Chanakya Niti : बायको नाही म्हणणारच नाही; नवऱ्यांनो फक्त 'हे' करा
@niidhi_0.0 हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'वॉर्डन मला थांबवायला आली, तिनेही डान्स केला.'
हा व्हिडीओ पाहिल्यावर खूप लोकांनी कमेंट केल्या आहेत. वॉर्डन आणि विद्यार्थ्यांमधील या अनोख्या नात्याचं कौतुक करण्यात आलं आहे. त्याच वेळी मुलांनी याबद्दल त्यांचे विनोदी अनुभव सांगितलं आणि मुला-मुलींच्या वसतिगृहातील वॉर्डनची तुलना सुरू केली. तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल किंवा राहिला असाल तर तुमचा असा काही अविस्मरणीय अनुभव असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.