TRENDING:

रील्स बनवण्याच्या नादात पाडली ऐतिहासिक भिंत, Video Viral होताच केलं असं काही...

Last Updated:

सोशल मीडियाचं जग झालं आहे. जिकडे तिकडे लोक सोशल मीडियावर व्यस्त असलेले पहायला मिळतात. दिवसातील बराचसा वेळ मोबाईलवरच घालवताना दिसतात. प्रकाश झोतात येण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: सोशल मीडियाचं जग झालं आहे. जिकडे तिकडे लोक सोशल मीडियावर व्यस्त असलेले पहायला मिळतात. दिवसातील बराचसा वेळ मोबाईलवरच घालवताना दिसतात. प्रकाश झोतात येण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतात. बऱ्याचदा मजेच्या नादात लोकांकडून अनेक गंभीर चुकाही होत असतात. अशीच काहीशी घटना सध्या घडली असून एका व्यक्तीनं रीलसाठी केलेली मस्ती-मजा त्याच्याच अंगलट आली. ज्यामुळे त्याला माफीही मागावी लागली. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया.
रील्स बनवण्याच्या नादात पाडली ऐतिहासिक भिंत
रील्स बनवण्याच्या नादात पाडली ऐतिहासिक भिंत
advertisement

राजस्थानच्या जैसलमेर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेले कुलधारा गाव खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जगप्रसिद्ध पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळ असलेल्या कुलधारामध्ये भिंत फोडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याचबरोबर या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येऊ लागली.

advertisement

Shocking Video : बाहेरचं खाताय? व्हिडीओ पाहून बंद कराल, स्वयंपाकघरात फिरतायेत मोठ-मोठे उंदीर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण दिसत आहेत. यातील एक तरुण कुलधाराच्या भिंतीला लाथ मारतो आणि भिंत पाडतो. भिंत पाडल्यानंतर ते हसत हसत तेथून निघून जातात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकही या घटनेबद्दल संताप व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

ही भिंत कुलधारा गावातील ऐतिहासिक भिंत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी संताप व्यक्त केला. हे प्रकरण चिघळत चालल्याचं पाहून तरुणानं एक व्हिडीओ शेअर करत माफीदेखील मागितली. @Shaitan92760225 नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या/Viral/
रील्स बनवण्याच्या नादात पाडली ऐतिहासिक भिंत, Video Viral होताच केलं असं काही...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल