Shocking Video : बाहेरचं खाताय? व्हिडीओ पाहून बंद कराल, स्वयंपाकघरात फिरतायेत मोठ-मोठे उंदीर
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरात भरपूर फूडी लोक आहेत. आजकाल लोकांना बाहेरचं खायला आवडतं. त्यामुळे स्ट्रीट फूड, ढाबा, हॉटेलमध्ये कायमच गर्दी पहायला मिळते. मात्र आपण आवडीनं खात असलेले पदार्थ स्वच्छता असलेल्या ठिकाणी बनवलेत का? हा प्रश्न नेहमीच डोळ्यासमोर येतो.
नवी दिल्ली: जगभरात भरपूर फूडी लोक आहेत. आजकाल लोकांना बाहेरचं खायला आवडतं. त्यामुळे स्ट्रीट फूड, ढाबा, हॉटेलमध्ये कायमच गर्दी पहायला मिळते. मात्र आपण आवडीनं खात असलेले पदार्थ स्वच्छता असलेल्या ठिकाणी बनवलेत का? हा प्रश्न नेहमीच डोळ्यासमोर येतो. सोशल मीडियावर तर खायला बनवताना स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा असलेले अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका हॉटेलच्या स्वयंपाकघरातील किळसवाणा प्रकार समोर आला. ज्याला पाहून तुम्हाला अक्षरशः उलटी येईल.
हॉटेलमधील स्वयंपाक घरातील एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ उडवत आहे. व्हिडीओतील स्वयंपाक घरातील अवस्था पाहून तुम्हाला किळस, उलटी आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केलाय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती कढईत पुरी तळत आहे. तो त्याच्या कामात मग्न आहे पण कॅमेरा दुसरीकडे सरकताच तुम्हाला स्वयंपाकघरात मोठमोठे उंदीर आरामात फिरताना दिसतील. ज्या भांड्यात पुरीचे पीठ ठेवले होते त्याच भांड्यात एक उंदीर पीठ खात होता. तेथे उपस्थित कोणाला काही फरक पडत नाही आणि या घाणीत अन्न तयार केलं जात आहे.
advertisement
Please, always check the kitchen of weddings, or local food distribution system, don’t let it become a common sight. This is alarming. pic.twitter.com/LI5JzfcHql
— Chirag Barjatya (@chiragbarjatyaa) January 1, 2024
@chiragbarjatyaa नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 16 सेकंदांचा हा किळसवाणा व्हिडीओ पाहून तुम्हाला परत कुठे बाहेर खाण्याची इच्छा होणार नाही. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून लोक संताप व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही मात्र सध्या इंटरनेटर या व्हिडीओनं खळबळ उडवली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2024 10:34 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Shocking Video : बाहेरचं खाताय? व्हिडीओ पाहून बंद कराल, स्वयंपाकघरात फिरतायेत मोठ-मोठे उंदीर