पोर्ट सेंट लुसी येथील ही घटना. 44 वर्षीय पीटर रियारा एका बंद पबच्या बाहेर तीन लोकांशी बोलत होता . सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. पण नंतर एक प्रश्न आणि त्यावरून वाद सुरू झाला, कोंबडी किती अंडी घालते? हा वाद इतका टोकाला गेला की चक्क गोळीबार झाला.
मी मुंग्यांसोबत राहू शकत नाही...! मुंग्या पाहून घाबरली महिला, भीतीने संपवलं स्वतःचं आयुष्य
advertisement
रियाराला लक्षात आलं की ते त्याला मूर्ख बनवण्याचा किंवा फसवण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणून त्याने 45-कॅलिबरची बंदूक बाहेर काढली आणि चार गोळ्या झाडल्या. त्याच्यासोबत तिघं जण कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झालं. एक रस्त्याकडे पळून गेला, तर इतर दोघं लपले. सुदैवाने कुणालाही गोळी लागली नाही किंवा दुखापत झाली नाही. पण घटनास्थळी घबराट पसरली.
पोलिसांनी सांगितलं की, रिएराने स्वतः 911 वर फोन करून घटनेची तक्रार केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तपासात असं दिसून आले की इतर तिघं रिएराच्या ओळखीचे होते आणि ते त्या रात्री भेटले होते. सर्वजण मद्यपान करत होते. रिएराशिवाय पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली. एकाने पोलिसाचा हिंसक प्रतिकार केला, तर दुसरा ज्याने हिंसाचार न करता प्रतिकार केला.
Cobra Vs Python Vs Anaconda : कोब्रा, अजगर की अॅनाकोंडा; कोण सगळ्यात खतरनाक?
पोलीस अधिकारी मेसिटी म्हणाले, "जर तुम्ही दारू पिऊन असाल तर शस्त्र उचलणं चांगलं नाही. त्याचा शेवट नेहमीच वाईट होतो." पीटर रियारा सध्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावर अनेक आरोप आहेत.
