बऱ्याचदा खूप प्रयत्न करूनही रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळत नाही. काही वेळा आपण खूप आधीच बुकिंग केलेलं असतं, पण तरी ते प्रवासाची तारीख उजाडेपर्यंत कन्फर्म होत नाही. काही वेळा आपला प्लॅनच वेळेवर ठरलेला असतो,अशावेळीही रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. पण यासाठी काही पर्याय आहेत, जे वापरून तुम्ही शॉर्ट टाइममध्येही कन्फर्म सीट मिळवू शकता. जाणून घेऊयात असेच काही पर्याय.
advertisement
रेल्वेचं कन्फर्म तिकीट अॅप
तिकीट मिळवण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन IRCTC ने Confirmtkt अॅप लाँच केलं आहे. Android फोनमध्ये Confirmtkt अॅप वापरता येईल. हे इंग्रजी आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. इथं तुम्हाला प्रत्येक ट्रेनमधील वेगवेगळ्या सीट्स तपासण्याची गरज नाही. एकदा सर्च केल्यानंतर, तुम्हाला त्या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांमधील उपलब्ध मोकळ्या जागांची माहिती मिळते. तिकीट नसल्यास काही अतिरिक्त पैसे देऊन तिकीट बुक करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. पण तिकीट बुक करण्यासाठी, IRCTC लॉगिन आयडी आवश्यक असेल.
रेल्वेची विकल्प योजना
प्रवाशांना कन्फर्म तिकीट देण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने 2015 मध्ये विकल्प योजना सुरू केली. रेल्वेने अल्टरनेट ट्रेन एकोमोडेशन स्कीम (ATAS) ला VIKALP असं नाव दिलं आहे. या योजनेद्वारे प्रवाशांना शक्य तितकी कन्फर्म तिकिटे देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. या अंतर्गत, ऑनलाइन वेटिंग तिकीट बुक करताना, प्रवासी कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी दुसर्या ट्रेनचा ऑप्शन देखील निवडू शकतात.
तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक करता तेव्हा, VIKALP ऑप्शन तुम्हाला आपोआप सुचवला जाईल. या ऑप्शनमध्ये, ज्या ट्रेनमध्ये तुम्हाला वेटिंग तिकीट मिळाले आहे, त्याशिवाय तुम्हाला त्या रुटच्या इतर ट्रेन निवडण्यास सांगितलं जातं. कोणत्याही पर्यायी ट्रेनमध्ये सीट किंवा बर्थ उपलब्ध असल्यास, त्यांनी निवडलेल्या कोणत्याही ट्रेनमध्ये त्यांना आपोआप सीट/बर्थ देण्यात येईल. बुक केलेल्या तिकिटाच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही हा ऑप्शन चेक करु शकता.
विकल्प योजनेअंतर्गत तुम्ही 7 ट्रेन निवडू शकता. ही ट्रेन बोर्डिंग स्टेशनपासून डेस्टिनेशनपर्यंत 30 मिनिटांपासून ते 72 तासांपर्यंत धावली पाहिजे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जर तुम्ही विकल्प योजना निवडली असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 100% कन्फर्म तिकीट मिळेल.
तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ बुकिंगचा पर्याय
तत्काळ तिकीट बुकिंग एसीसाठी सकाळी 10 वाजता आणि स्लीपरसाठी सकाळी 11 वाजता सुरू होते. ट्रेन सुटण्याच्या फक्त एक दिवस आधी बुकिंग करता येते. याशिवाय इमर्जन्सी परिस्थितीसाठी प्रीमियम तत्काळ तिकीट बुकिंगचाही पर्याय आहे. मात्र, यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ट्रेनमधील सीट्स भरल्या की लगेच प्रीमियमच्या किमती वाढतात. हे अगदी विमान कंपन्यांच्या तिकीट बुकिंग सिस्टिमसारखं आहे.
काय सांगता! पैसे नसले तरीही करता येईल रेल्वेचा प्रवास; नक्की काय आहे सुविधा?
मेक माय ट्रिपचा गॅरंटी प्रोग्राम
मेक माय ट्रिपने कन्फर्म तिकीट बुकिंगसाठी ट्रिप गॅरंटी प्रोग्राम सुरू केला आहे. जर ट्रेन पूर्ण भरलेली असेल तर प्रवासी 60 किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या रेल्वे स्थानकांवरूनही बुकिंग करू शकतात. तुम्ही गंतव्य स्टेशनजवळील स्टेशनवर देखील उतरू शकता. चार्ट तयार होण्यापूर्वी तिकीट रद्द केल्यास कंपनी पूर्ण रिफंडही देत आहे. रेल्वे तिकीट कन्फर्म न झाल्यास फ्लाइटचा पर्यायही देण्यात आला आहे. या शिवाय कॅब आणि बसचा पर्यायही या गॅरंटी प्रोग्राममध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. कंपनी प्रवाशाला ट्रॅव्हल व्हाउचर देखील देते, ज्याचा वापर करून ते त्यांच्या प्रवासातील अतिरिक्त खर्च टाळू शकतात. तसेच त्यांना तिप्पट रिफंडही मिळू शकतं.