एका व्यक्तीनं उंच बाईक बनवलीय. ही बाईक बघून कोणीही चकित होईल. एवढ्या उंचावर बसून गाडी चालवण्याचा हा जुगाड सध्या इंटरनेटवर चांगलीच खळबळ माजवत आहे.
Viral Video : पहिल्यांदा किस केलं मग मिठी मारली, भरधाव गाडीवर दोन तरुणींची स्टंटबाजी
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक तरुण बाईकवर बसला आहे. जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही अनोखी बाईक लोखंडापासून बनवलेल्या सपोर्टवर आहे. त्यावर स्वार होणं अजिबात सुरक्षित नाही. चुकून काही घडलं तर दुर्घटना घडू शकते. मात्र जुगाडू व्यक्ती एवढ्या उंचावर बाईकवर चढला आहे. खाली काही लोक सपोर्टसाठी उभे आहेत. मग अशा प्रकारे ही गाडी चालवणार कशी? असा अनेकांना प्रश्न पडलाय.
advertisement
re4team नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत. हा जुगाड पाहून नेटकरीही थक्क झालेत. काहींनी म्हटलं लोक मरण्यासाठी आता असे जुगाड शोधत आहे तर काहींनी म्हटलं, ही गाडी चालवणार तरी कशी, ज्यांच्याकडे काही काम नाही ते असे फालकू गोष्टी करत आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट व्हिडीओवर येत आहेत.
