Viral Video : पहिल्यांदा किस केलं मग मिठी मारली, भरधाव गाडीवर दोन तरुणींची स्टंटबाजी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
रस्त्यावर स्टंट करताना अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तरुण तरुणी विविध गोष्टी करत, स्टंटबाजी करत सोशल मीडियावर प्रसिद्धी झोतात येण्याचा प्रयत्न करतात.
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : रस्त्यावर स्टंट करताना अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तरुण तरुणी विविध गोष्टी करत, स्टंटबाजी करत सोशल मीडियावर प्रसिद्धी झोतात येण्याचा प्रयत्न करतात. व्हायरल होण्यासाठी अनेक निराळ्या पद्धती तरुणाई शोधून काढत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये दोन तरुण भरधाव बाईकवर स्टंटबाजी करताना पहायला मिळाल्या. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चकित व्हाल.
सध्या दोन तरुणींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये दोन तरुणी स्टंटबाजी करत एकमेकींना मिठी मारत, किस करताना दिसल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
advertisement
चर्चेत आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन मुली रस्त्यावर बाईक चालवत स्टंटबाजी करत आहेत. दोघी एकमेकींकडे तोंड करुन बसल्या आहेत. हॅंडल सोडून गाडी भरधाव वेगानं धावताना दिसतेय. या धावत्या गाडीवर दोघी एकमेकींना किस करत आणि मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर विविध प्रकराच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या कृतीवर संताप व्यक्त केलाय. या व्हिडीओनं पुन्हा एकदा खळबळ उडालीय. हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे स्पष्ट झालं नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 31, 2023 10:21 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : पहिल्यांदा किस केलं मग मिठी मारली, भरधाव गाडीवर दोन तरुणींची स्टंटबाजी









