अंजली उर्फ अंजू जी पंजाबच्या लुधियानामधील आहे. काही वर्षांपूर्वी लांबच्या नातेवाईकांच्या ओळखीनं तिचं आशिष कुमार झाशी लग्न झालं होतं. त्यानंतर ती बिहारमध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वी ती पती आशिष आणि त्याचा मित्र अभयकुमार झासोबत दिल्लीला आली. अभयही बिहारचा राहणारा होता.
दिल्लीत आल्यावर त्याचा मित्र विवेकानंद मिश्राने त्याला राहायला आपलं घर दिलं. जिथं तो कोचिंग घ्यायचा, कोचिंगनंतर घर रिकामीच असायचं. घराची एक चावी त्याने आशिषला दिली. विवेकानंद त्याच्या पत्नीसह दिल्लीच्या पटेलनगर परिसरात दुसऱ्या घरात राहत होता. शुक्रवारी विवेकानंदची पत्नी काही कामासाठी म्हणून आशिष राहत असलेल्या घरी आली. तिला खोलीतून घाणेरडा वास येऊ लागला, तसंच रक्तही दिसलं. तिनं लगेच पोलिसांना याची माहिती दिली.
advertisement
नवरा-बायको घरात बसून बनवायचे पॉर्न व्हिडीओ, 500 मुली आणि 22 कोटींची कमाई
पोलीस घटनास्थळी आले. 28 मार्चला बेडमध्ये एका बॅगत एका महिलेचा मृतदेह सापडला. हा मृतदेह अंजलीचा होता. अंजलीची हत्या करण्यात आली होती. तिचा पती आशिष आणि त्याचे दोन मित्र विवेकानंद आणि अभय यांनी तिची विटाने ठेचून हत्या केली होती. मृतदेह त्यांनी एका बॅगेत भरून बेडमध्ये लपवला. बॅग नाल्यात फेकायची होती पण त्यांना ती संधी काही मिळाली नाही. आशिष हत्येनंतर घाबरून पळून गेला. विवेकानंद आणि अभय मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संधी शोधत होते.
आशिष, अभय आणि विवेकानंद यांच्यात समलैंगिक संबंध होते. एके रात्री अंजू एका खोलीत झोपली होती. तिला जाग आली तेव्हा. तिन्ही मित्र दुसऱ्या खोलीत नको ते कृत्य करताना दिसले. अंजूने त्यांना पाहिलं, तिला त्यांच्याबाबत समजलं होतं. म्हणून त्यांनी तिच्या हत्येचा कट रचला. शनिवारी तिला दिल्लीला आणलं आणि रविवारी विटाने ठेचून तिची हत्या केली.
Work From Home च्या नावाने महिलांची हनीट्रॅपसाठी भरती, गोव्यात फ्रॉड, मुंबईशी कनेक्शन
पोलिसांच्या चौकशीत विवेकानंद आपला जबाब बदलत राहिला पण अभयने समलैंगिक संबंधामुळेच हत्या केल्याची कबुली दिली आहे. तर आशिषचा शोध सुरू आहे.