नवरा-बायको घरात बसून बनवायचे पॉर्न व्हिडीओ, 500 मुली आणि 22 कोटींची कमाई

Last Updated:

Couple earning story : नवरा-बायको मिळून घरबसल्या एक कंपनी चालवत होते. कंपनी जाहीरात मार्केटिंग रिसर्च आणि ओपनियन पोलशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं होतं. FEMA नियमांचं उल्लंघन केल्याचा संशय होता म्हणून ईडीने धाड चाकली. तेव्हा सत्य समोर आलं.

News18
News18
नवी दिल्ली : पैसा कमवण्यासाठी काही ना काही करावंच लागतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका कपलने घरबसल्या थोडेथोडके नव्हे तर तब्बल 22 कोटी रुपये कमवले आहेत. घरात हे कपल असं करायचं काय? ते जेव्हा पाहिलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांच्या कमाईची पद्धत खूप अजब होती.
नोएडातील हे प्रकरण आहे. ईडीने एका घरावर छापा टाकला. तेव्हा जे दृश्य पाहिलं ते पाहून सगळे हादरले. या कपलच्या घरी काही तरुणी होत्या. या तरुणी मॉडल्स होत्या. ज्या शो करत होत्या. हा शो साधासुधा नाही. तर आक्षेपार्ह होता. तसंच घरातून 8 लाख रुपयेही जप्त करण्यात आले.
कपलने बनवली होती कंपनी
नवरा-बायकोने मिळून सबडिजी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी बनवली होती. कंपनी जाहीरात मार्केटिंग रिसर्च आणि ओपनियन पोलशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं होतं. FEMA नियमांचं उल्लंघन केल्याचा संशय होता म्हणून ईडीने धाड चाकली. तेव्हा सत्य समोर आलं.
advertisement
मॉडलिंगमध्ये करिअर बनवण्याच स्वप्न पाहणाऱ्या तरुणींना हे कपल सोशल मीडियावर जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढायचे. जाहीरात पाहून तरुणी त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या. त्यांना पैशांचं आमिष देऊन अश्लील व्हिडीओच्या धंद्यात ढकललं जायचं. त्यांनी 500 तरुणी हायर केल्या अशी माहिती आहे.
advertisement
आक्षेपार्ह व्हिडीओचा व्यवसाय
ही कंपनी आक्षेपार्ह व्हिडीओचा व्यवसाय करत होती. कपल एका परदेशी वेबसाईटला आक्षेपार्ह व्हिडीओ आणि वेबकॅम शो विकत होते. कोट्यवधींची कमाई करत होते. कपलने साइप्रसची कंपनी टेक्नियस लिमिटेडसोबत करार केला होता. ही कंपनी एक्हॅम्सटर, स्ट्रिपचॅट अशा अश्लील वेबसाईट चालवते.   अश्लील व्हिडीओ बनवून हे कपल या कंपन्यांना विकायचं. त्याबदल्यात त्यांना मोठी रक्कम पाठवली जायची. कमाईचा 25 टक्के हिस्सा हे कपल मॉडल्सना द्यायचं.
advertisement
ईडीच्या मते, सबडिजी कंपनी आणि संचालकांच्या अकाऊंटमध्ये परदेशातून 15.66 कोटी आल्याचं समजलं. याशिवाय नेदरलँड्समधूनही एका अकाऊंटमधून 7 कोटी रुपये पाठवण्यात आले होते. हे पैसे इंटरनॅशनल डेबिट कार्डच्या माध्यमातून कॅशच्या रुपात काढण्यात आले आहेत. आतापर्यंत 22 कोटी रुपयांबाबत माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या/Viral/
नवरा-बायको घरात बसून बनवायचे पॉर्न व्हिडीओ, 500 मुली आणि 22 कोटींची कमाई
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement