लखनऊच्या गोल्फ सिटीतील हे प्रकरण. इथं राहणाऱ्या एका कपलला 11 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता पती-पत्नीला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्या जोडप्याने मेसेज उघडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मेसेजमध्ये एक व्हिडीओ होता. हा व्हिडिओ त्याच्या घराच्या बाथरूमचा होता. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांची रात्रीची झोप उडाली आणि दिवसाची शांती हिरावून घेतली.
advertisement
असं ठिकाण जिथं पुरुषांना एकटं जायला मनाई, काय आहे कारण?
व्हिडीओमध्ये काय होतं?
या व्हिडिओमध्ये पती-पत्नी बाथरूममध्ये आंघोळ करताना दिसत होते. कपल धावत बाथरूममध्ये गेलं आणि त्यांनी तपासलं तर बाथरूमच्या छतावर एक छिद्र आढळून आलं. कुणीतरी त्यांचा व्हिडीओ शूट केला होता आणि तो व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करत होता. हा व्हिडिओ पाठवून अज्ञाताने कपलकडे 6 कोटी रुपयांची मागणी केली. 6 कोटी रुपये घेऊन त्याने कपलला गोमती नगरला बोलावलं.
कपलची पोलिसात धाव
जोडप्याने मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली. बाथरूममध्ये छुप्या कॅमेऱ्याचा वापर करून कोणीतरी त्यांचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला होता, असं या जोडप्याने पोलिसांना सांगितलं. पैसे दिले नाहीत तर व्हिडीओ लीक करण्याची धमकी त्याने दिली. यावर सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनने एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. सध्या त्या अज्ञात तरुणाचा कोणताही पत्ता नाही.
