असं ठिकाण जिथं पुरुषांना एकटं जायला मनाई, काय आहे कारण?
- Published by:Priya Lad
Last Updated:
जर तुम्ही अशा ठिकाणी पोहोचलात जिथं पुरुषांना एकटं जाण्यास मनाई आहे तर तुम्ही काय म्हणाल? त्यांना फक्त कुटुंब किंवा पार्टनरसह त्या भागात भेट देण्याची परवानगी आहे.
नवी दिल्ली : सामान्यपणे अशी काही ठिकाणं आहेत जिथं महिलांनी एकटं जाऊ नये, असं म्हणतात कारण ते ठिकाण सुरक्षित नसतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक असं ठिकाण आहे जिथं चक्क पुरुषांना एकटं जायला बंदी आहे. त्यातही आणखी आश्चर्याचा धक्क तुम्हाला बसेल जेव्हा समजेल की ठिकाण दुसरं तिसरं कोणतं नाही तर प्राणीसंग्रहालय आहे.
जर तुम्ही अशा ठिकाणी पोहोचलात जिथं पुरुषांना एकटं जाण्यास मनाई आहे तर तुम्ही काय म्हणाल? त्यांना फक्त कुटुंब किंवा पार्टनरसह त्या भागात भेट देण्याची परवानगी आहे. असं कोणतंही ठिकाण असू शकतं का? तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण एका प्राणीसंग्रहालयामध्ये असा नियम आहे. असाच एक आदेश जारी केला आहे.
या प्राणीसंग्रहालयात पुरुषांना बंदी
जपानच्या तोचिगी प्रीफेक्चरमधील लिंग पॅव्हेलियन प्राणीसंग्रहालय आहे. हे प्राणीसंग्रहालय गेल्या वर्षीच मार्चमध्ये उघडण्यात आलं. इथं लोक डुक्कर, मांजर, कुत्रे आणि मेंढ्या यांसारख्या प्राण्यांसोबत वेळ घालवू शकतात. प्राण्यांशी संवाद साधून उपचारात्मक सहवास प्रदान करणं हा त्याचा उद्देश होता. पाळीव प्राणी असलेल्या लोकांसाठी इथं एक डॉग पार्कदेखील आहे.
advertisement
पण या प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर एक विचित्र बोर्ड लावण्यात आला आहे. त्यावर पुरुष पर्यटक इथं एकटं येऊ शकत नाहीत, असं लिहिलं आहे.
काय आहे कारण?
चाइना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार प्राणीसंग्रहालयाचे संचालक मीसा मामा यांनी सांगितलं की, इथं येणारे बहुतेक लोक कुटुंबं आणि जोडपी असले तरी, काही अविवाहित पुरुषांनी महिला पर्यटकांना त्रास दिला आहे. प्राणीसंग्रहालयाची संचालक असल्याने ती थोडी जास्त सहन करत होती. पण तिच्या आणि इतर महिला पर्यटकांवरील छळाच्या घटना असह्य झाल्या होत्या. शेवटी त्यांना हा कठीण निर्णय घ्यावा लागला.
advertisement
महिलांच्या छळाच्या घटनांनंतर इंटरनेटवर वाद निर्माण झाल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. पण आता या निर्णयामुळेही सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
February 15, 2025 11:36 AM IST


