Anti Valentine Slap Day : असं रेस्टॉरंट जिथं 'थप्पड' खायला येतात लोक, यासाठी पैसेही देतात
- Published by:Priya Lad
Last Updated:
स्लॅप डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला एका अशा रेस्टॉरंटबाबत सांगणार आहोत, जिथं ग्राहक खास थप्पड खाण्यासाठी येतात. या रेस्टॉरंटचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
व्हॅलेंटाईननंतर सुरू होतो तो अँटी व्हॅलेंटाईन वीक. या आठवड्याचा पहिला दिवस स्लॅप डे. जो 15 फेब्रुवारीला साजरा केला जातो. एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात ज्या चुकीच्या भावना असतील त्यांना स्लॅप करण्यासाठीचा म्हणजे थोबाडीत मारण्याचा हा दिवस. थोबाडीत मारणं म्हणजे ते वाईट विचार काढून टाकणं. तुम्ही तुमच्या स्वभावातील नकारात्मक गोष्टीही काढून टाकायला या दिवशी सुरुवात करू शकता.
advertisement
स्लॅप डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला एका अशा रेस्टॉरंटबाबत सांगणार आहोत, जिथं ग्राहक खास थप्पड खाण्यासाठी येतात. हे रेस्टॉरंट जपानमध्ये आहे, ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये एक जपानी वेट्रेस रेस्टॉरंटच्या ग्राहकांना कानशिलात मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक हैराण झाले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


