एका कपलने गाडीत रिल बनवलं. गाडीत पती-पत्नी आणि मुलं असं संपूर्ण कुटुंब होतं. कपलने गाडीत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करणं एका कुटुंबासाठी महागात पडलं. मिळालेल्या माहितीनुसार, पती गाडी चालवत होता आणि त्याची पत्नी तिच्या चार मुलांसह गाडीच्या मागच्या सीटवर बसून मोबाईलवर रील बनवत होती. तिने हे रील फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलं. पण त्यामुळे ते अडचणीत आले. एका व्यक्तीने हा व्हिडिओ पाहिला आणि लगेचच वाहतूक विभागाला टॅग करून तक्रार दाखल केली.
advertisement
हे काय आहे? थिएटरमध्ये Lokah फिल्म पाहायला गेली तरुणी, नको तेच करत बसली, Photo Viral, लोक संतप्त
आता तुम्ही म्हणाल कितीतरी कपल असे रिल्स पोस्ट करतात, मग या महिलेने काय चूक केली. तर व्हिडिओमध्ये महिला आणि मुलं कारमध्ये सीट बेल्टशिवाय रील बनवताना दिसत आहेत. कार वेगाने जात होती, तरी त्यांनी बेल्ट लावला नव्हता.
तक्रारीनंतर राज्य परिवहन विभागाने तात्काळ कारवाई केली आणि कार मालकाला नोटीस पाठवली. मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण 11,000 रुपयांचा दंड ठोठावला. कार मालकाने वाहन चालवताना सर्व प्रवाशांना सीट बेल्ट घालणे अनिवार्य असल्याने नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल ते दोषी आढळले.
ही घटना गाडीत बसून सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत राहणाऱ्या सर्वांसाठी एक इशारा आहे. सोशल मीडियावर काही सेकंदांची प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात स्वतःचा आणि मुलांचा जीव धोक्यात घालणं शहाणपणाचं नाही.
माहितीनुसार ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यातील रेडाखोल भागातील हा प्रकार असल्याचं वृत्त इंडिया टिव्हीने दिलं आहे.