TRENDING:

स्वत:चं बायकोचं कुंकू पुसलं, बॉयफ्रेंडशी लावलं लग्न; प्रेमासाठी काय पण म्हणतात, पण या नवऱ्यानं केलं भलतच

Last Updated:

एका प्रकरणाने सगळ्यांनाच थक्क केलं, जिथे नवऱ्याने स्वत:च्या हाताने बायकोचं कुंकू पुसलं आणि तिला तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या काळात नातं जपणं जितकं आवश्यक आहे, तितकंच कठीण झालं आहे. सोशल मीडियावर रोज नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसीशी संबंधित अनेक विचित्र बातम्या समोर येतात. या गोष्टी पाहून असं वाटतं की आता प्रेम आणि विश्वास यांचं नातं फार नाजूक झालं आहे. हल्लीच अशाच एका प्रकरणाने सगळ्यांनाच थक्क केलं, जिथे नवऱ्याने स्वत:च्या हाताने बायकोचं कुंकू पुसलं आणि तिला तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

गोंडाच्या खोड़ारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौलतपूर ग्रांट गावात हा प्रकार घडला. हरिश्चंद्र नावाचा 40 वर्षीय व्यक्ती आपल्या 35 वर्षीय बायको करिश्मा आणि दोन मुलांसोबत राहत होता. हरिश्चंद्र सूरतमध्ये काम करत असे, पण आजारपणामुळे तो गावी परत आला होता. तेव्हा त्याला समजलं की करिश्माचे सूरतमध्ये असतानाच महाराजगंज जिल्ह्यातील शिवराज नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध सुरू झाले होते.

advertisement

एका दिवशी गावकऱ्यांनी हरिश्चंद्रला सांगितलं की करिश्मा आणि शिवराज एकत्र आहेत. तो घरी आला आणि त्यांना रंगेहाथ पकडलं. मात्र रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी हरिश्चंद्रने धक्कादायक निर्णय घेतला त्याने ठरवलं की करिश्माने जर प्रेमी निवडला आहे, तर त्याच्याशीच तिचं लग्न करून दिलं पाहिजे.

गावातील बुढ्ढू बाबा मंदिरात सर्वांच्या उपस्थितीत हरिश्चंद्रने आपल्या हाताने बायकोचं कुंकू पुसलं. त्यानंतर पंडिताला बोलावून शिवराज आणि करिश्माचं लग्न लावून दिलं. हे पाहून गावकरी अवाक झाले. त्यावेळी करिश्माला वाईट वाटलं ज्यामुळे रडत होती, पण तिन् आपल्या प्रियकराशी लग्न केलंच. नवऱ्यानं तिला न स्वीकारण्यासाठी आपलं मन बनवलं होतं. अखेर लग्नानंतर करिश्मा तिच्या मुलीसोबत प्रेमीसोबत निघून गेली, तर मुलगा हरिश्चंद्रसोबत राहिला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीला केला रामराम, 2 मित्रमैत्रिणीने सुरू केला यशस्वी फूड ब्रँड, कमाई तर पाहा
सर्व पहा

या प्रकरणावर खोड़ारे पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रबोध कुमार यांनी सांगितलं की, "या लग्नाविषयी थेट कुणीही तक्रार दिली नाही. जर कोणीतरी तक्रार देईल, तर चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल." या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात नवरा स्वत: आपल्या हाताने बायकोचं डोक्यातील सिंदूर साफ करत असताना दिसत आहे. नात्यांचं हे विचित्र रूप पाहून अनेक जण हैराण झाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
स्वत:चं बायकोचं कुंकू पुसलं, बॉयफ्रेंडशी लावलं लग्न; प्रेमासाठी काय पण म्हणतात, पण या नवऱ्यानं केलं भलतच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल