कोणत्याही देशाचं बजेट त्या देशाची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या या दोन गोष्टींवर अवलंबून असतं. पाकिस्तान भारतात असला असता तर भारताचं बजेट किती असलं असतं हे नेमकं सांगणं शक्य नाही; मात्र पाकिस्तानचं 2024-25च्या आर्थिक वर्षाचं बजेट 18,877 अब्ज पाकिस्तानी रुपये एवढं आहे. त्याचं मूल्य भारतीय रुपयांत 5.65 लाख कोटी रुपये एवढं होईल. एक फेब्रुवारी 2024 रोजी निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केलं होतं. कारण गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक होणार होती. हे बजेट 47,65,768 कोटी रुपये होतं. ते 2023च्या तुलनेत सहा टक्के मोठं होतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर त्या वर्षाचं भारताचं बजेट पाकिस्तानच्या तुलनेत आठ पट मोठं होतं.
advertisement
भारतात बजेट एक फेब्रुवारी रोजी सादर होतं. पाकिस्तानात बजेट सादर करण्यासाठी विशिष्ट दिवस ठरलेला नाही. ते दर वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला सादर केलं जातं. पाकिस्तानात आर्थिक वर्ष एक जुलैपासून सुरू होतं. पाकिस्तानात बजेट सादर करण्यापूर्वी मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाते. त्यानंतर विद्यमान सरकारचे अर्थमंत्री नॅशनल असेम्ब्लीमध्ये बजेटचं भाषण करतात. पाकिस्तानात ज्या दिवशी नॅशनल असेम्ब्लीमध्ये बजेट सादर केलं जातं, त्या दिवशी अन्य कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी नसते. भारताचं बजेट पाकिस्तानच्या तुलनेत किती तरी मोठं आहे. त्याचं सर्वांत मोठं कारण पाकिस्तानची आर्थिक स्थिती चांगली नाही हे आहे. पाकिस्तानवर मोठं कर्ज आहे.