TRENDING:

Indian Railway : खरंच ट्रेन स्टेशन मास्तर चालवतो का? मग लोको पायलट काय करतो?

Last Updated:

कार, जीप, बस किंवा ट्रक अशा प्रत्येक वाहनात स्टेअरिंग आवश्यक आहे. याद्वारे त्यांना वळवण्याचे आणि स्टेअरिंग करण्याचे काम केले जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ट्रेनमध्ये कोणतेही स्टेअरिंग नसते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्याला तर हे माहित आहे की ट्रेन चालवण्याचे काम लोको पायलट करत असते, तर काही ठिकाणी तुम्ही असेही ऐकले असेल की ट्रेन लोको पायलट चालवत नाही तर स्टेशन मास्टर करतो. अशा स्थितीत अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न उपस्थीत होतो की यापैकी नक्की कशावर विश्वास ठेवावा? यापैकी काय खरं? चला सविस्तर जाणून घेऊ.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

ट्रेन नक्की कोण चालवतं?

कार, जीप, बस किंवा ट्रक अशा प्रत्येक वाहनात स्टेअरिंग आवश्यक आहे. याद्वारे त्यांना वळवण्याचे आणि स्टेअरिंग करण्याचे काम केले जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ट्रेनमध्ये कोणतेही स्टेअरिंग नसते. अशा परिस्थितीत जेव्हा ट्रेन वळवावी किंवा एका ट्रॅकवरुन दुसऱ्या ट्रॅकवर न्यायची असते तेव्हा हे कसं केलं जातं?

advertisement

यामध्ये सर्वात मोठे योगदान स्टेशन मास्तरांचे आहे. लोको पायलट त्याला पाहिजे तिकडे ट्रेन वळवू शकत नाही, अशावेळी रेल्वेचा एक कर्मचारी असतो ज्याला ट्रेन वळवण्यासाठी म्हणजेच ट्रॅक बदलण्यासाठी काम करतो, याला पॉइंट्समन म्हणतात. त्याचबरोबर रेल्वे ट्रॅक बदलण्याचा निर्णय हा लोको पायलटचा नाही तर स्टेशन मास्टरचा असतो.

कोणत्या स्टेशनवर ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर थांबवायची आणि कोणत्या स्टेशनवर थांबायची नाही, याचा निर्णय रेल्वे मुख्यालयाकडूनच घेतला जातो. यामुळेच ट्रेन चालवण्याचे श्रेय अनेकदा लोको पायलटऐवजी स्टेशन मास्टरला दिले जाते.

advertisement

मग लोको पायलटचे काम काय असते?

आता जर ट्रेन वळवण्याचं काम स्टेशन मास्तर करतो आणि ट्रेनला स्टेअरिंग पण नसतं, मग अशात लोको पायलटचं काम काय? तो काय करतो?

ट्रेन चालवण्याचे संपूर्ण काम लोको पायलट करतो, ट्रेनचा ट्रॅक बदलणे हे त्याच्या हातात नसलं तरी गार्डच्या समन्वयाने ट्रेन चालवणे हे त्याचे काम असते. सिग्नल पाहून ट्रेन सुरू करायची की थांबवायची याचा निर्णयही लोको पायलट घेतो. रेल्वेच्या साईन बोर्डच्या आधारे वेग वाढवायचा किंवा कमी करायचा हा निर्णयही पायलटची जबाबदारी आहे.

advertisement

याशिवाय जेव्हा रेल्वेशी संपर्क नसतो तेव्हा मागच्या डब्यात बसलेल्या गार्डशी समन्वय साधून हुशारीने ट्रेन चालवणे, त्याची स्पीड मेन्टेन ठेवणे. ट्रेन थांबवणे हे लोको पायलटचे काम असते. अशा परिस्थितीत लोको पायलट ट्रेन चालवत नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल.

मराठी बातम्या/Viral/
Indian Railway : खरंच ट्रेन स्टेशन मास्तर चालवतो का? मग लोको पायलट काय करतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल