ट्रेनमध्ये घरचं खाणं नेणं महागात पडत आहे. यासाठी दंड आकारला जात आहे. भारतीय रेल्वेने ही विशेष मोहीम सुरू केली आहे. हजारो प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबरपासून उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागाने कचरा टाकणं आणि धूम्रपान केल्याबद्दल 5113 प्रवाशांवर कारवाई केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रवाशांना 10,26,670 रुपयांचा विक्रमी दंड आकारण्यात आला आहे. सर्व विभागांमध्ये अशीच कारवाई सुरू आहे.
advertisement
आता घरचं खाणं खाल्लं म्हणून रेल्वे का दंड आकारात आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अनेक प्रवासी घरी शिजवलेले अन्न घेऊन जातात. खाल्ल्यानंतर ते ट्रेन किंवा स्टेशनमध्ये उरलेलं अन्न फेकून देतात, ज्यामुळे घाण पसरते. जेव्हा रेल्वे कर्मचारी त्यांना पकडतात तेव्हा ते वेगवेगळी कारणं देतात. पण स्वच्छता राखण्यासाठी अशा प्रवाशांवर कारवाई केली जात आहे.
भारतीय रेल्वे गाड्या स्वच्छ आणि नीटनेटक्या ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गाड्या आणि स्थानकांमध्ये कचरा टाकणं आणि धूम्रपान करणं याविरुद्ध विशेष मोहिमा देखील सुरू केल्या जात आहेत. रेल्वेच्या मते, घाणेरडेपणामुळे स्थानकांच्या सौंदर्यावर आणि स्वच्छतेवर परिणाम होतो आणि आरोग्यावरही परिणाम होतो. घाणेरडे प्लॅटफॉर्म, उघड्यावर थुंकणं, घाणेरडी शौचालयं किंवा कचरा आणि उरलेले अन्न यामुळे दुर्गंधी निर्माण होते आणि संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे प्रवाशांचा अनुभव आणि भारतीय रेल्वेची प्रतिमा खराब होते. म्हणूनच अशा मोहिमा चालवल्या जात आहेत.
धडक धडक धडक धडक! ट्रेनचा आवाज हा नेमका येतो तरी कुठून? Watch Video
भारतीय रेल्वेने प्रवाशांना स्थानक परिसरात स्वच्छता राखण्यास मदत करण्याचं आणि उघड्यावर थुंकणं किंवा धूम्रपान करणं यासारख्या सवयी टाळण्याचं आवाहन केलं आहे. अशा मोहिमा सुरूच राहतील आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
रेल्वे विभागाच्या 'खान- पान' सेवेला करोडोंचा महसूल, केटरिंगच्या उत्पन्नात विक्रमी वाढ
खान- पानाचा दर्जा सुधारण्यासाठी मध्ये रेल्वेने मागील काही महिन्यात अनेक प्रयोग केले आहेत. त्यामुळे केटरिंगच्या उत्पन्नात यंदा मोठी वाढ झाली आहे. केटरिंगमधून पुणे रेल्वे विभागाला मागच्या 6 महिन्यात तब्बल 1 कोटी 71 लाखांचा महसूल मिळाला आहे. रेल्वे स्थानक आणि रेल्वेत मिळणारे अन्न हे चांगले नसल्याच्या तक्रारी मागच्या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. ह्याच गोष्टीची काळजी घेऊन पुणे विभागातील वाणिज्य विभागाकडून नियोजन करून मोठे प्रयत्न करण्यात आले.
दर्जाहीन अन्न विकणाऱ्या वेंडर्सकडून रेल्वे विभागाकडून वारंवार कारवाई करण्यात आली. तसेच अवैध वेंडर्सला रेल्वे स्थानक आणि रेल्वेत खाद्यपदार्थ आणि पेय विकण्यास मनाई देखील करण्यात आली. रेल्वेतील किचनचा दर्जा दर्जा तपासण्यासाठी त्याठिकाणी साफसफाई पाहण्यासाठी,सोबतच खाद्यपदर्श चांगले आहेत की नाही हे तपासण्यासाठी पथक नेमून,वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमधून नमुने घेण्यात आले. रेल्वेतील अस्वच्छ किचन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करण्यात आली.