प्रयागराज विभागातून जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक टीटीई तिकिटं तपासण्यासाठी आला. जेव्हा तो एसी कोचमध्ये पोहोचला तेव्हा एका प्रवाशाने त्याला पाहिलं आणि तो पटकन त्याच्या सीटवरून उठला आणि वेगाने चालू लागला. टीटीईला संशय आला की प्रवाशाने तिकीट काढलं नाही. म्हणून त्याने प्रवाशाचा पाठलाग केला प्रवासी टॉयलेटमध्ये गेला. टीटीईने वारंवार दरवाजा ठोठावला, पण आतून दरवाजा उघडला नाही. नंतर काही वेळाने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा टीटीईने शौचालयाच्या आत पाहिलं. शौचालयातील दृश्य पाहून टीटीईचे डोळे विस्फारले! का? त्याने आत काय पाहिलं?
advertisement
VIDEO : ट्रेनमध्ये मोबाईलने रेकॉर्ड करत होता सुंदर दृश्य, त्यानंतर जे दिसलं ते पाहून थरथर कापू लागला
टॉयलेटमध्ये पाहिल्यानंतर टीटीई खूप रागावला. आतील दृश्य पाहून तो संतापला. यानंतर प्रवाशाला दंड ठोठावण्यात आला. असं आत काय घडलं? ट्रेनमधील प्रवाशांनीही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं.टीटीईने आत काय पाहिलं हे त्यांनाही माहित नव्हतं. टीटीईने प्रवाशाला शौचालयात बसून सिगारेट ओढताना पाहिलं. ट्रेनमध्ये धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे प्रवाशाला दंड ठोठावण्यात आला.
6 जून, 11 जून आणि 13 जून रोजी प्रयागराज विभागातील प्रयागराज जंक्शन, मिर्झापूर, प्रयागराज चेनकिरो स्थानकांवर विनातिकीट प्रवास, बेकायदेशीर तिकिटे, बेकायदेशीर वस्तू वाहून नेणं, गाड्यांमध्ये कचरा टाकणं आणि बेकायदेशीर व्यापाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 24 बेकायदेशीर व्यापाऱ्यांना पकडून रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) स्वाधीन करण्यात आलं. नंतर दंडाधिकारी स्तरावर कायदेशीर कारवाई केल्यानंतर 24 फेरीवाल्यांपैकी 6 जणांना तुरुंगात पाठवण्यात आलं.
Indian Railway : भारतातील अशी ट्रेन जिच्या प्रत्येक डब्यात असतात पैसे
प्रयागराज जंक्शनवर 15 गाड्या तपासण्यात आल्या आणि एकूण 340 प्रवाशांना 2,30,620 रुपये दंड ठोठावण्यात आला. यापैकी 142 जणांना तिकिटाशिवाय प्रवास केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. 1,38,180 दंड बेकायदेशीर तिकिटांवर प्रवास केल्याबद्दल 196 प्रवाशांकडून 91840 रुपये दंड, कचरा टाकल्याबद्दल 2 प्रवाशांकडून 600 रुपये दंड.
प्रयागराज रेल्वे स्थानकावर 20 गाड्यांची तपासणी करण्यात आली आणि एकूण 343 प्रवाशांना 2,07,950रुपये दंड ठोठावण्यात आला. यापैकी 117 प्रवाशांना तिकिटाशिवाय प्रवास केल्याबद्दल 1,05,700 रुपये, 221 प्रवाशांना 1,01,250 रुपये दंड ठोठावण्यात आला, तर 5 प्रवाशांना कचरा टाकल्याबद्दल प्रत्येकी 1000 रुपये दंड ठोठावण्यात आला.