VIDEO : ट्रेनमध्ये मोबाईलने रेकॉर्ड करत होता सुंदर दृश्य, त्यानंतर जे दिसलं ते पाहून थरथर कापू लागला
- Published by:Priya Lad
Last Updated:
Train Video : ट्रेनमध्ये मोबाईलमध्य व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली : किती तरी लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात. काही लोकांना ट्रेनच्या आत बसून राहण्यापेक्षा खिडकी किंवा दरवाजातून बाहेरचं दृश्य पाहायला आवडतं. काही जण हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. असाच एक प्रवासी चालत्या ट्रेनमधून दिसणारं बाहेरील दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत होता. पण त्याला असं काही दिसलं की तो थरथर कापू लागला.
ट्रेनमध्ये मोबाईलमध्य व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. ट्रेनमध्ये असलेल्या तरुणाने बाहेरील सुंदर दृश्य पाहून आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन केला. ट्रेन एका नदीवर होती, पुलावरून जात होती. तरुण हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करत जातो.
advertisement
तोच पुढे असं काही घडतं की आपल्याही काळजाचा ठोका तुकतो. थोडं पुढे जाताच ब्रीजच्या कडेला एक तरुण उभा होता, जो ट्रेनमधील तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
माहितीनुसार ही घटना राजेंद्र सेतूवरील आहे, माहितीनुसार शुक्रवारी कोशी एक्सप्रेसमधून के एक प्रवासी प्रवास करत होता तेव्हा ही घटना घडली आहे. सुदैवाने तरुण मोबाईल घेण्यात यशस्वी झाला नाही.
advertisement
चालत्या मेट्रोमधून चोराने चोरला फोन
याआधी चालत्या मेट्रोमध्येही अशाच पद्धतीने फोन चोरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मेट्रोच्या गेटवर उभी होती. ती स्टेशनवर मेट्रो सुरू होण्याची वाट पाहत उभी होती. काही सेकंदांनंतर एक प्रवासी येतो आणि ट्रेनमध्ये चढतो. गेटवरच उभं राहून तो फोन वापरु लागतो आणि याच गोष्टीचा फायदा ट्रेन सुरू होण्याची वाट पाहत असलेली व्यक्ती घेते.
advertisement
मेट्रो सुरु होणार आणि त्याचे दरवाजे आता बंद होणार तोच चोर त्या व्यक्तीच्या हातातील फोन हिसकावतो आणि तिथून पळ काढतो. दरवाजा पूर्णपणे बंद झाल्यानंतर ती व्यक्ती ट्रेनमधून उडी मारण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ही या चोरासाठी चांगली संधी होती.
advertisement
official_rajthakur__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. कॅप्शनमध्ये ही घटना दिल्लीतील असल्याचं सांगण्यात आलं होतं.
Location :
Delhi
First Published :
July 13, 2025 11:07 AM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : ट्रेनमध्ये मोबाईलने रेकॉर्ड करत होता सुंदर दृश्य, त्यानंतर जे दिसलं ते पाहून थरथर कापू लागला