मागून पाहिलं तर दिसते बिकिनीत, पुढून पाहिलं तर साडीत, महिलेचा VIDEO तुफान VIRAL

Last Updated:

Woman in saree and bikini : एका महिलेच्या अनोख्या स्टाईलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिला पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच टिकल्या. तिच्यावरून कुणाचीच नजर हटत नव्हती.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
 नवी दिल्ली : आजवर तुम्ही बऱ्याच फॅशन पाहिल्या असतील. वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे पाहिले असतील. पण सध्या अशाच फॅशनचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत. एका महिलेचा हा व्हिडीओ आहे. या महिलेला मागून पाहिलं तर ती बिकिनीत दिसते आणि पुढून पाहिलं तर साडीत दिसते. आता हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि ही फॅशन पाहण्याची उत्सुकताही असेल.
एका महिलेच्या अनोख्या स्टाईलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अगदी काचेच्या बॉक्समध्ये चार बाजूंनी वेगवेगळ्या गोष्टी दिसाव्यात आणि नाण्याच्याही दोन बाजू असतात तशी ही महिला मागून आणि पुढून अशा दोन बाजूंनी पाहिल्यानंतर वेगळी दिसते.
व्हिडीओमध्ये महिला बिकिनी आणि साडी एकत्र घालून दिसली. या अशा अवतारात ती रस्त्यावर चालत होती. जणू काही ते फॅशन शोमध्ये रॅम्प वॉकच करते आहे. तिला पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच टिकल्या. तिच्यावरून कुणाचीच नजर हटत नव्हती.
advertisement
महिलेने मागून साडी अशा पद्धतीने नेसली होती की बिकिनी दिसत होती. साडीचा पदर मागून तिने सैल सोडला होता. त्यामुळे मागील भाग पूर्ण दिसत होता. पुढून पाहिलं तर ती साडी नेसलेली दिसत होती.
माहितीनुसार हा व्हिडीओ niteshsoniy इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला होता. पण नंतर तो डिलीट करण्यात आला आहे. व्हिडीओ आता इन्स्टाग्रामवर उपलब्ध नाही. पण त्याचा व्हिडीओ ग्रॅब व्हायरल होतो आहे. यावर बऱ्याच कमेंट आल्या. कुणी तिला बोल्ड आणि बिनधास्त म्हटलं. तर कुणी कुणी तिच्यावर टिका केली आहे. डिजीटल प्रसिद्धीसाठी लाज, मर्यादा आता बाजूला ठेवली जात आहे का? असं म्हटलं आहे.
advertisement
सोशल मीडिया हे प्रसिद्धीचं सोपा मार्ग. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत यामार्फत पोहोचता येतं. प्रसिद्धीसाठी लोक काहीही करतात. या महिलेनेही प्रसिद्धीसाठी नको तेच केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
मागून पाहिलं तर दिसते बिकिनीत, पुढून पाहिलं तर साडीत, महिलेचा VIDEO तुफान VIRAL
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement